धुळे येथील श्री. सुभाष हिरालाल शेठ बडगुजर व सौ. रत्नाताई सुभाषशेठ बडगुजर, अ. भा. ब. स. महिला समिती अध्यक्ष यांचे चिरंजीव श्री. योगेश बडगुजर यांनी कोविड सेंटर मध्ये कोरोना बाधितांचा मनोबल उंचाविण्यासाठी योगसनांचे शिक्षण देत आहेत. धुळे शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल कोरोनाबाधितांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या वॉर्डबॉय योगेश बडगुजर यांनी रुग्णांना योगासनांचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. त्याच्या या उपक्रमाला रुग्णांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने जुन्या जिल्हा रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये सौम्य लक्षणे असलेले आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल केले जात आहे. सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी सद्य:स्थितीत १२ कोरोना बाधित दाखल झाले आहेत. त्यांची शुश्रूषा करण्यासाठी महापालिकेने कंत्राटी पद्धतीने भरती केलेले डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉयची नियुक्ती केली आहे. सेंटरमध्ये योगेश बडगुजर हे वॉर्डबॉय नियुक्त आहे. बडगुजर रोजस्वत: योगाभ्यास करतात. ते या ठिकाणी रोजचे काम सांभाळून रोज सकाळी रूग्णांना योगासनाचे धडे देत आहे.

भीतीने गर्भगळीत झालेल्या रुग्णांना दिलासा मिळावा, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी या उद्देशाने योगेश बडगुजर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी यापूर्वी अजमेरा कॉलेज आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये सेवा दिली. जागेचा अभाव असल्यामुळे रुग्णांना योगासनांचे धडे देणे. त्यांना शक्य झाले नाही. आता जिल्हा रूग्णालय कोविड सेंटरमध्ये प्रशस्त जागा असल्याने ते रूग्णांना रोज योगासने शिकवितात. मोठी जबाबदारी पेलण्याची क्षमता असून.. तीही संधी नक्कीच मिळेल. हे कोरोना तील अतुलनीय कार्य हे त्यांना भविष्यात निश्चित फलदायी ठरेल. यांच्या बरोबरच संपूर्ण समाजाचा गौरव वाढला आहे. त्यांच्या हातून अशीच अखंड रुग्ण सेवा होत राहो हीच प्रभु चरणी प्रार्थना.
आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

श्री. योगेश सुभाषशेठ बडगुजर, धुळे

Leave a Reply