❄️संपूर्ण जगात थैमान घालत असलेल्या “कोरोना” वर यशस्वीपणे मात करत श्री.उमेशआप्पा करोडपती सर व कुटूंबातील सारे सदस्य स्वगृही सुखरुप परतलेत : प्रा.सी.डी.साळुंखे सर, धुळे

कुलस्वामिनी चामुंडा माता प्रसन्न
आभार !आभार !!आभार !!!

मी उमेश हिरालाल करोडपती, संस्थापक अध्यक्ष, श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित, शैक्षणिक संकुल पारोळा,चेअरमन – कै.हि. मो करोडपती विद्यालय चोपडा व मा.अध्यक्ष अ.भा.बडगुजर समाज महा समिती.

दिनांक १ सप्टेंबर २०२० हा दिवस मी व माझ्या परिवारावर आघात करणारा ठरला, म्हणून आमच्या आयुष्यातील “एक काळा दिवस” असे संबोधितो. सदर काळा दिवस आमचे कडे चोरपावलाने ‘कोरोना’ घेऊन आला, उजाडल्या उजाडल्या घरातील १२ सदस्यापैकी(मी,माझी पत्नी व थोरली सून सोडून) ९ सदस्यांवर एक-एक करत ‘कोरोना’ ची लक्षण दिसू लागलीत, ‘अँटीजीन टेस्ट’ केलेवर सर्व नऊ सदस्य पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले, तत्परतेने सर्व सदस्यांना चोपडा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर दिपक पाटील {(डॉ साई)आमचे मेहुणे तथा आत्तेभाऊ} यांच्या खाजगी कोवीड सेंटरला हलविलेत व ॲडमिट केलेत,त्यावेळी डॉ साईनी मला जळगाव येथून टेस्ट करायला सुचविलेवर पारोळा परतलो परंतु रात्री अचानक ताप भरला व अशक्तपणा जाणवून श्‍वसनाचा त्रास होवू लागला, म्हणून २ सप्टेंबरच्या सकाळी माझा लहान मुलगा संकेत व त्याचे मित्र डॉक्टर कुँवर व अमोल पाटील, मुख्याध्यापक हेमंत पाटील व विजय बडगुजर यांनी नाशिक येथील ‘अशोका हॉस्पिटल’ मध्ये ॲडमिट केले,तेथे डॉक्टर सचिन पाटील(माझा विद्यार्थी) व मुलाने प्रयत्न करून स्पेशल रूम मिळवून डॉक्टर तिवारी यांनी ट्रीटमेंट सुरू केली, वयवर्षे ७२,कुटूंबातील ९ सदस्य चोपडा येथे भरती कारणे मी पूरता घाबरून गेलो व मला श्वास घेण्यास असह्य त्रास होत असतांना तेथिल डॉक्टरांनी माझी विशेष काळजी घेऊन माझे मनोधैर्य वाढविले.
मी व माझे कुटूंबीय ‘कोरोना’ चा सामना करत असतांना माझे काका तात्यासाहेब डॉ.वसंतराव करोडपती,मोठे मेव्हुणे बापूसो.सोमनाथ साळुंखे,विठ्ठलबापू पाटील, मोठे बंधू विजयअण्णा, डॉ,ए,ओ,पाटील,सुरेशदादा रघुवंशी,डॉ.साई तसेंच वरील सर्वांच्या परीवारातील सर्व सदस्य,भगीनी,जावईमुली,व्याही,आप्तेष्ठ बडगुजर समाजातील सर्व मान्यवर तथा माझ्या शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आमच्या परिवारावर निस्सीम प्रेम करणारे पारोळा शहरातील सर्व स्तरातील हितचिंतकांनी आपुलकीने चौकशी करून आमचा आत्मविश्वास वाढविला,धीर दिला व लवकर बरे होणेसंबंधीच्या शुभेच्छा दिल्यात. पारोळ्याचे माजी खासदार श्री मोरे काकांनीही आपुलकीने २-३ वेळेस फोन करून मनोधैर्य वाढविले.
अशाप्रकारे आपण सर्वांच्या आशीर्वादाने/सदिच्छेने मी व माझ्या कुटुंबीयांतील सर्व सदस्यांनी ‘कोरना’ वर मात करून विजय मिळवला व आम्ही शनिवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री सुखरूप घरी परतलोत.
बारा दिवस म्हणजे एक तपा सारखे वाटलेत,सदर काळ्याकुट्ट संकटातून आम्ही सारे बाहेर पडलोत. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक हेमंत पाटील हे चोपडा येथे ‌ॲडमिट आहेत तेही माझ्या कुटूंब सदस्य आहेत. परमेश्वर त्यांना लवकरच बरं करून घरी पाठवतील ही मला खात्री आहे.
सदर संकटातून सावरून मी व माझ्या कुटूंबियातील सारे सदस्य पूर्ववत आपल्या सेवेसाठी लवाकरच तयार होत आहोत,तत्पूर्वी आपण सर्व आप्तेष्ट,नातेवाईक,समाज बांधव,पारोळेकर मित्र परिवार, शैक्षणिक संस्थेचे सर्व शिल्पकार अशा सर्वांच्या ऋणात आम्ही राहू इच्छितो.
“आपण सर्वांचे त्रीवार आभार..धन्यवाद”
याप्रसंगी परमेश्वर चरणी एकच प्रार्थना करतो… ” हे परमेश्वरा ‘कोरोना’चे दुष्टचक्र/सावट फक्त भारत नव्हे तर अखंड जगातून लवकरात लवकर नाहीसे कर”.
“आपण सर्वांचे असेंच प्रेम आमचेवर असू देत हे नम्र निवेदन”
•~•~•~•~•~•~•~•~•
आपला : उमेश करोडपती,पारोळा

विनंती – सामाजिक अंतर ठेवा, मास्क लावा, श्वसनाचे व्यायाम करा, गरम पाणी प्या व आपला आत्मविश्वास वाढवा.

श्री. उमेश आप्पा करोडपती,पारोळा

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*