श्री. गुलाब अमृत बडगुजर हे शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे ता. अमळनेर, जि. जळगाव येथुन दि:- ३१-०५- २०२० रोजी चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी ३९ वर्ष ६ महिने शासकीय सेवा पूर्ण करून निवृत्त झाले.
कळमसरे ता. अमळनेर मुळगाव -बहादरपूर ता. पारोळा येथील समाज बांधव श्री गुलाब अमृत बडगुजर हे श्री.सखाराम अमृत बडगुजर ( टिटवाळा )यांचे कनिष्ठ बंधू आहेत.श्री. गुलाब अमृत बडगुजर ,कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे , येथे दि. ०५-१२- १९८१ रोजी शिपाई या पदावर रुजू झाले. लहानपणी वडिलांचे पितृछत्र हरपल्या नंतर कै. श्री. चिंतामण आनंदा बडगुजर (मामा) यांची मोठ्या प्रमाणात मदत झाली. शाळेतल्या कामाव्यतिरिक्त यांनी वेळेत वेळ काढून शेतीकडे लक्ष दिले. आपल्या कुटुंबासोबत इतर लोकांचे आयुष्य सुद्धा घडवीले.
स्वभावाने शांत असलेले श्री.गुलाब अमृत बडगुजर यांनी आपली प्रदीर्घ अशी शासन सेवा निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने पूर्ण केली. सुरुवातीच्या काळात गरिबीची परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी कधी आपल्या ३९ वर्ष ६ महिन्याच्या दीर्घ सेवा काळात कोणताही डाग आपल्या चारित्र्यावर व सेवेवर लागू दिला नाही. या संपूर्ण काळात पत्नी सौ. वंदना यांची अनमोल अशी साथ आपणास लाभली.
श्री. गुलाब अमृत बडगुजर यांनी आपल्या मुलांना व मुलींना उच्चशिक्षित केले आहे. ३ मुलींचे लग्न झाले असून ते सर्व गुण्या गोविंदाने आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहेत.दोन्ही मुले अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण झाले आहेत.
श्री गुलाब अमृत बडगुजर यांचे निवृत्ती नंतरचे आयुष्य दीर्घ व निरोगी लाभो हिच शुभेच्छा. त्यांच्या भावी वाटचालीस युवक समिती, बडगुजर प्राऊड व बडगुजर वेबसाईट परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.???


गुलाब बडगुजर यांना भावी आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य निरोगी व आनंदाचे जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना.