धरणगावला दिहिचा परिवारातर्फे सालाबादप्रमाने सलग 32 व्या वर्षी नवरात्रोंस्तव व देवीचे थाट उत्साहात साजरा झाले. इ.स.1988 पासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
इ. स. 1988 पासून हा कार्यक्रम श्री.मनोहर गंगाराम बडगुजर यांच्या घरी आई चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन करुण घटस्थापना केली जाते. दिहिचा परिवाराने सलग 32 व्या हा कार्यक्रम घेऊन उज्वल परंपरा कायम ठेवली.

घटस्थापना च्यां दिवशी आई चामुंडा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून नवरात्रोंस्तवाला सुरुवात होते. नवरात्रित दररोज सकाळ व संध्याकाळी दिहिचा परिवारातील प्रत्येक दांपत्याला आरतीचा मान दिला जातो. धरणगावला दिहिचा परिवारातील सर्व युवक व माता बगिनी रात्रि गर्बा खेळन्यासाठी मोठ्या संखेने उपस्थित असतात.
शेवट अष्टमीच्या दिवशी देवीचे थाट(चक्रपूजा) व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. समजा जर दिहिचा परिवारातील एखादे कुटुंब देवीचे थाट करायला इच्छुक असेल तर तो करु शकतो. तेव्हा ते कुटुंब स्वखर्चाने देवीचे थाट करते. या वर्षी अष्टमीच्या दिवशी
श्री.मुकेश रामदासशेठ बडगुजर यांनी स्वखर्चाने देवीचे थाट केले. अष्टमीच्या दिवशी चक्रपूजा व महाप्रसादासाठी लागणाऱ्या साहित्य घेण्यासाठी दिहिचा परिवारातिल प्रत्येक कुटुंबातील एक सदस्य उपस्थित असतो.

महाप्रसादात पूरणपोळी, खीर, चने, मनुका(फूनके) यांचा समावेश असतो. धरणगांवात दिहिचा परिवाराचे जवळपास 52 घर आहे,. सुमारे पाचशे लोकांचा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. दिहिचा परिवारातिल सर्व माता, बगिनी चुल्ह्यावर खापर ठेवून पूरणपोळया बनवतात. महाप्रसादातील सर्व पदार्थ फक्त आंब्याचा लाकडांचा वापर करुण चुल्ह्यावर बनवले जातात. मला वाटते की एवढा मोठा कार्यक्रम कुठेच साजरा होत असेल.
सर्व दिहिचा परिवारातिल सदस्य व इतर व्यक्तिनचा सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी होण्याचे श्रेय हे ज्यांनी या कार्यक्रमाला अनमोल सहकार्य केले त्यांना जाते.
रोहीत बडगुजर
धरणगांव



Leave a Reply