कुलदेवता चामुंडा वर्षभरात आरत्या कशा लावतात याबाबत माहिती – श्री. एस्. एम्. बडगुजर सर

बडगुजर समाजाची कुलदेवता चामुंडा माता असुन तिच्या वर्षभरात  पाच आरत्या लावण्यात येतात. आजही सर्व समाज बांधव पाच आरत्या काही अडचण (अडथळा) उदा. सुतक, इर्धी वगैरे नसल्यास लावीत असतात. ह्या आरत्या कशा व त्या साठी काय साहित्य लागते या बाबतीत नवीन पिढीला परीपूर्ण माहिती व्हावी एवढेच

वर्षभरात आरत्या   कोणत्या तिथीला येतात या बाबत सविस्तर माहिती खालिल प्रमाणे. 

१) प्रथम आरती फाल्गुन शुद्ध पोर्णिमा -होळी नंतरच्या प्रथम येणाऱ्या शुक्रवारी

२) आषाढी एकादशी-आषाढ शुध्द एकादशी

३) राखी पौर्णिमा- श्रावण शुद्ध पोर्णिमा

४) दशहरा (दुर्गा अष्टमी) – अश्विन शुद्ध अष्टमी

५) खोपड़ी एकादशी- कार्तिक शुद्ध एकादशी

वरील आरत्यांसाठी लागणारे साहित्य-

गव्हाच्या कणकेच्या प्रत्येकी ९ या प्रमाणे

१) नऊ- पापड्या २) नऊ-दिवे ३) नऊ- वेण्या

४) नऊ- फण्या ५) नऊ – गोट्या ६) नऊ -भोवरे 

७) नऊ – टिकल्या ८) बांगड्या ९) नववी- लापशी या सर्व तुपात तळून संध्याकाळी-७:३०/८:००पर्यंत आरत्या लावाव्यात. 

इतर साहित्य :- नागवेलीची दोन पाने, कापूर, हळदी, कुंकू, अगरबत्ती, फुले, पंचरंगी दोरा, वगैरे

कुलदेवता चामुंडा मातेचा मंत्रोच्चारात व दिवे पेटवून चामुंडा मातेची आरती म्हणावी आणि 

दुसऱ्या दिवशी सकाळी पुजन करुन घरातील मंडळींनी ती आरती खावी अशा प्रकारे कुलदेवता चामुंडा मातेच्या पाच आरत्यांची माहिती संकलन करुन किंवा प्रिन्ट काढून ठेवावी जेणे करून आरत्या लावतांना अडचण निर्माण होणार नाही

संकलन:- एस्.एम्.बडगुजर,मो.९९६७९०६२६३.

3 Comments

  1. मान.एस एम सरांनी चांगली माहिती दिली.

    नमस्कार.

Leave a Reply

Your email address will not be published.


*