पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वृक्ष लागवड हाच उपाय नाही – प्रा. मिलिंद बडगुजर सर

मित्रांनो, निसर्गाचा समतोल राखण्यात जे काही महत्त्वाचे घटक कार्य करतात त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे वृक्षसंपदा होय. माणसाला वृक्षवेलींचे मोठेपण ,त्यांची आवश्यकता ,फार पूर्वीच कळली होती .म्हणूनच प्राचीन काळी ऋषीमुनी निसर्गसानिध्यात अध्ययन व अध्यापन, तपश्चर्या करत असत. नेहमीच्या दगदगीतून दूर जाण्यासाठी, हवा पालटण्यासाठी आपण कुठे जातो ? अर्थातच निसर्गाच्या सान्निध्यातच ना . त्यागाच्या भावनेने समर्पित होऊन आपली सावली, पाने, फुले, मुळे सतपुरुषांप्रमाणे दुसऱ्याला देणाऱ्या, या उपकार करत्या वृक्षाचा आज र्हास होत आहे. “आफ्टर मेन द डेझर्ट ” ‘मानवाचे पाउल नी वाळवंटाची चाहूल’ अशी म्हण आहे. या ना त्या अनेक कारणांसाठी वृक्षतोड आजही सुरूच आहे . आपणा सर्वांना अकबर-बिरबलाच्या गोष्टी माहीत आहेत. एकदा अकबराने प्रश्न विचारला 27 मधून नऊ वजा केले तर काय उरेल ? दिलेल्या उत्तरांनी अकबराचे समाधान होईना. शेवटी बिरबलाने सांगितले 0 उरेल. 27 नक्षत्र मधून पावसाची नऊ नक्षत्रे वजा केली ,तर जीवन संपुष्टात येईल. मात्र आजच्या काळात तंत्रज्ञानाची युग आले आहे .आज याच प्रश्नावर दरबारी म्हणाले असते की ,9 वजा केले तरी काही बिघडणार नाही . कारण आम्ही सागराच्या खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करु, हवेतील बाष्प पासून पाणी बनविणारे यंत्र आम्ही बनवली आहे . एवढेच नाही तर ढगांमध्ये मीठ अथवा अन्य रसायनांचा वापर करून थंडावा निर्माण करू. कृत्रिम पाऊस पाडू .हे सर्व खरेच आहे .परंतु हे सर्व करणार कुठे कुठे ? हा एक प्रश्नच आहे. . याच बेहोशीने आज मानवाने 27 मधून 9 खरेच वजा केले आहे. विहिरी ,धरणे ,तलाव ,कोरडे पडत आहे .नद्या सुकल्या आहेत. उत्पादन खर्च ,भरून न निघाल्याने ,कर्जफेड करू न शकलेले शेतकरी आत्महत्या करीत आहे. अवर्षण ,अतिवृष्टी, महापूर, अवकाळी पाऊस, बर्फवृष्टी ,घटते भूजल ,उष्णतेच्या लाटा, वादळे ,यामुळे शेतीची शाश्वती राहिली नाही .जंगलातून बाहेर पडून, शेतीत अन्नासाठी शिरणाऱ्या प्राणी व पक्ष्यांची नवी समस्या निर्माण झाली आहे. . वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ते खनिज संपत्ती प्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही. बेसुमार वृक्षतोडीमुळे उष्णता वाढली ,पावसाचे प्रमाण कमी होऊन ,जमिनीची धूप होऊन, ती नापीक होत चालली. दुष्काळाचे सावट अधिक गर्द होत आहे.परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांमुळे नवनवीन आजारांचा जन्म होत आहे .वातावरणाचा तोल ढासळत आहे .आजच्या पेट्रोल पंपा सारखे भविष्यकाळात ऑक्सिजन पंप सुरू झाल्यास नवल वाटायला नको . . . निसर्गाच्या साखळीत गुंतागुंतीची चक्रे आहेत .माणसाला ती चक्रे निर्माण करणे, तर सोडाच ती दुरुस्त करणेसुद्धा ,जमले नाही. वृक्षतोडीने अनेक पशु ,पक्ष्यांचे आश्रयस्थान नष्ट होऊन अनेक प्रजाती लुप्त होत आहे .यामुळे पूर्वी अंगणात खेळणारे पक्षी आज आम्हाला फक्त पुस्तकातच दिसत आहेत . . मुळात मानवाने पृथ्वीवर झाडे लावली नव्हती .तरी देखील यंत्रयुग सुरू होण्याअगोदर घनदाट जंगले होती .दर्या होत्या. नद्या दुथडी भरून वाहत होत्या. वारा ,पाणी ,कीटक व अन्य जीव मार्फत परागकणांची वहन क्षणोक्षणी सुरू होते .आधुनिक मानवाने त्यात अडथळे आणून मधमाशा ,भुंगे ,पक्षी ,फुलपाखरे यांनाच नामशेष केले .हवामानात तापमानात होणारा बदल विनाशाची गीत गात आहे .कार्बन डाय-ऑक्साइड ,मिथेन, क्लोरोफ्ल्युओरोकार्बन ,नाइट्रोजन यांचे प्रमाण वाढून जंगल व सागरातील हरितद्रव्य नष्ट केले गेले. पृथ्वीला माहीत नसलेली अनेक नवी संयुगे मानवाने तयार केली आणि कल्पनेतही नसलेल्या ओझोन वायू ला खिंड पाडली. . गांबिया या आफ्रिकन देशाच्या विकासाच्या अहवालातून हे स्पष्ट झाले आहे की कॉंक्रिटीकरण, शहरीकरण, व जंगलाच्या नाशामुळे पावसाचे प्रमाण1200 मिलीमीटर वरून 600 मिलिमीटर वर आले आहे. मातीतील सूक्ष्म जीव ,जीवाणूंचा, जमिनीच्या पोताशी ,सच्छिद्रतेशी, प्राणवायू खेळण्याशी, व जंगल वाढीशी, पाऊस जमिनीत तग धरून ठेवण्याच्या ,मातीच्या ,व जंगलाच्या क्षमतेची ,व पाऊस पडण्याची ,,आकाशात थेंब तयार करण्याशि संबंध आहे. परंतु आजच्या विज्ञानाला हे कळलेच नाही .रासायनिक खते ,फवारणी यामुळे जमिनीच्या शमता नष्ट झाल्या. एका मधमाशी मुळे पॅरालीसीस तसेच कोमात जाण्याची शक्यता एका डॉक्टरांनी बोलून दाखवली .त्याची काहीशी अनुभूती मी स्वतःघेतली आहे. . . वनस्पती सृष्टी व त्यावर आधारित प्राणी ,पक्षी ,कीटकांसाठी पाणी महत्त्वाचे आहे .पाणी हे ऑक्सिजन व हायड्रोजन या दोन ज्वालाग्राही मूलद्रव्यांचे संयुग आहे. मात्र पाण्याचे गुणधर्म या दोन्ही पेक्षा वेगळे कसे ?.सोडियम हा पाण्याच्या संपर्कात पेट घेतो ,तर क्लोरीन विषारी आहे ,तरीही सोडियम क्लोराइड म्हणजे मीठ सागराच्या पाण्याचा भाग कसा काय असतो? नद्यांचे पाणी सागरात मिळाले नाही तर क्षाराचे प्रमाण वाढेल व सागर मृत होईल. ‘अरल,’ सागर रशियामध्ये अशाच पद्धतीने नष्ट झाला. परंतु आम्ही विज्ञानवादी उच्च विद्या विभूषित आर्किटेक्चर तंत्रनिकेतक धरण बांधून पाण्याचा थेंब अन् थेंब अडवायला पाहिजे ,या चुकीच्या शिक्षणाने ,महापुरात वाहून जात आहोत. गांधीजींनी ‘हिंदवी स्वराज्य ‘ या ग्रंथात म्हटले आहे की “भारतीयांना यंत्र शोधता येत नव्हते असे नाही तर त्यांनी समजून उमजून शहाणपणाने ते टाळले ” याच यंत्रामुळे युरोप उजाड झाला आहे गांधीजींच्या मते भारतातील प्रत्येक शेत ही प्रयोगशाळा होती 1895 मध्ये डॉक्टर अल्बर्ट हावर्ड यांना ब्रिटिशांनी भारतीय शेतीचा अभ्यास करण्यासाठी पाठवले त्यांनी “”अण एग्रीकल्चर टेस्टामेंट” या ग्रंथात ” एकाच खाचरात जमिनीचा कस जाऊ न देता शेती करणारे भारतीय माझे गुरू आहे रसायन ही पिकांचे अन्न नाही तर विष आहे “असे म्हटले आहे .परंतु आम्ही रसायनांच पिकाचे अन्न समजून बसलो. . . मोठ्या प्रमाणावरील बांधकामे म्हणजे विकास नाही. हेसुद्धा दुबई पॅटर्न वाल्यांनाही कळून चुकले आहे. आधुनिक मनामनात अंधश्रद्धा पेरण्याचे काम मेकॉलेप्रणीत प्रणित शिक्षणाने केले .डोळस औद्योगीकरण हे एक मिथक आहे. हजारो वर्षे जंगलातील काट्याकुट्या जाळून चूली पेटवणारे यांना दोष दिला जातो. वृक्षतोड करणाऱ्या लाकूडतोड्याला व ती वाहतूक करणाऱ्या वाहकाच्या चालकांना कायद्याने शिक्षा केली जाते .परंतु हे सर्व औद्योगीकरण व शहरीकरणासाठी केले जाते त्याला मात्र प्रतिष्ठा दिली जाते. खाणकाम ,वाळूउपसा ,डोंगर कापणी हे अनाधिकृत, परंतु त्यामुळे वाढणारा जीडीपी मात्र वैध हे कुठले सूत्र आहे . . . हावर्ड याने म्हटले आहे ,यंत्रयुगाची भूक पृथ्वी भागवू शकणार नाही .एक पोकलॅण्ड पाचशे फूट उंचीचा पर्वत तीन तासात पाडू शकतो. मग भारतात दरवर्षी उत्पादित होणारे पोकलँड काय दिव्य करतील .डोंगर सपाट करून रस्ते म्हणजे विनाशाचे वाहक व अग्रदूत बनत चालले आहेत. नासा चे माजी संचालक डॉक्टर जेम्स हॅन्सेन यांनी “टॉर्म्स ऑफ माय ग्रँड चिल्ड्रेन “या ग्रंथात वातावरणातील कार्बन ची वाढ अभूतपूर्व व अत्यंत चिंताजनक कशी आहे, ते समजावून सांगितले आहे .वातावरणातील हा बदल महा विस्फोटक स्वरूपाचा आहे .ही मानव जातीला वाचवण्याची शेवटची संधी आहे .पृथ्वीचे तापमान हजारो वर्ष 15 डिग्री सेल्सियस स्थिर होते .मानवाने यंत्र आणून, ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून, प्रचंड प्रमाणात कार्बन निर्मिती केली .त्यामुळे तापमानात वाढ होऊन महासागरातील अभिसरण पद्धती मोडली गेली .त्यामुळे मान्सूनची चक्र बदलले .कधीही पाऊस पडू लागला .ध्रुवा वर व नद्या ,तलाव ,विहीर या ठिकाणी असणाऱ्या पाण्याची वेगाने वाफ होऊ लागली .त्यामुळे अचानक, अनियमित मुसळधार पाऊस व बर्फवृष्टी सुरू झाली .आधुनिक युगात जीवनाचा दर्जा महत्त्वाचा नसून .मानवी जीवन राखणे महत्त्वाचे आहे .”जान है तो जहान है ” . . आपल्या शरीरात निसर्गाच्या कोट्यावधी वर्ष चाललेल्या, प्रयोगशाळेने ,निर्माण केलेल्या, डोळ्यांना दिसू न शकणार्‍या, कोटींच्या संख्येने असलेल्या, सुक्ष्मतम, पेशींमधील घटक, आणि रचना ,कार्यपद्धती यांच्या तुलनेत ,मानवाने निर्माण केलेली मोटार ,विमान ,किंवा इतर कुठल्याही गोष्टी वस्तू ,शूद्र ठरेल. लक्षात ठेवा पृथ्वी नोकरी देण्यासाठी किंवा उद्योग चालवण्यासाठी नाही .’आपल्याला मानसून हवा आहे मोटर नको’ ‘ पाणी हवे पैसा नको ‘ ‘अस्तित्व हवे अर्थव्यवस्था नको ‘हे सर्व टाळण्याचा एकमेव मार्ग ,म्हणजे वृक्ष लागवड व संवर्धन ,एवढेच नसून आपल्या दैनंदिन जीवनातील ऊर्जा स्त्रोतांचा अतिरिक्त वापर टाळणे, तसेच शेतात रासायनिक खते, फवारणी न करणे ,विषारी संयुगांचा वापर करून अनुपद्रवी कीटकांचा ,सूक्ष्मजीवांचा ,नाश करणे थांबवणे ,साधी व पर्यावरण पूरक जीवनशैली आचरणात, आणून, आपण निश्चितच पर्यावरण वाचू शकतो.म्हणून आजपासूनच नव्हे ,आत्तापासूनच या गोष्टींचा अवलंब करण्याचा प्रयत्न करून पर्यावरण समतोल व संवर्धन करूया… आपलाच प्राध्यापक मिलिंद बडगुजर

प्रा. मिलिंद बडगुजर सर

1 Comment

  1. छान लेख…

    कुपया लेख वाचन करून सोडून न देता मित्रांनो
    निसर्गाच्या बाजुने उभे राह व येणाऱ्या पुढच्या पिढीला वाचवा..

    पुढील लेखणास सरांना माझ्या तर्फे शुभेच्छा..!

    श्री.नरेंद्र सिताराम बडगुजर व परिवार,औरंगाबाद.

Leave a Reply

Your email address will not be published.


*