Endurance Technology तर्फे घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत श्री.नरेंद्र बडगुजर यांना मिळाले व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक

दरवर्षा प्रमाणे यावर्षी देखील ४८वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह (४ मार्च ते १० मार्च) निमित्त Endurance Technology Ltd. E92 , Aurangabad तर्फे Slogans, Near miss & Poster competition सारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री.नरेंद्र बडगुजर यांनी गेल्या वर्षी देखील पोस्टर्स रंगवा स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवीला होता तरी या वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवुन पोस्टर्सच्या माध्यमातून “आजची पाण्याची बचत उद्याची भविष्याची सुरक्षा” हा संदेश सर्वांना दिला.

तसेच जागतिक महिला दिना निमित्त ही नरेंद्र यांनी पोस्टर्स रंगविली होती व प्लांट लेव्हलला सेलेक्शन झाले होते.

नरेंद्र बडगुजर हे नेहमीच आपल्या कलाकृती मधून सामाजिक विषयांवर पोस्टर काढत असतात व त्यातून समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

या पोस्टर करीता मिळाले बक्षिस
श्री. नरेंद्र बडगुजर, पोस्टर काढतांना

शुभेच्छूक :

अ. भा. बडगुजर समाज युवक समिती

बडगुजर प्राऊड ग्रुप

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*