दि 20 फेब्रुवारी 2021 रोजी कै. नथ्थू नामदेव बडगुजर यांच्या जयंती निमित्ताने बोराडी येथील छत्रपती शाहू महाराज हॉल या ठिकाणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याप्रसंगी लोकनेते कै. नथ्थू नामदेव बडगुजर सामाजिक प्रतिष्ठान बोराडी चे उद्घाटन धुळे जिल्ह्याचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष कै.नथ्थू आण्णा यांचे सन्मित्र श्री साहेबराव पितांबर पाटील हे असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीचे अध्यक्ष श्री माधवराव जानकीरामशेठ बडगुजर, माजी अध्यक्ष श्री सुरेश मगनशेठ बडगुजर, माजी अध्यक्ष श्री उमेश हिरालालशेठ करोडपती, माजी अध्यक्ष श्री आनंदभाऊ धोंडू सूर्यवंशी , श्रीमती सुशीलाताई नथ्थूशेठ बडगुजर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच समाज बांधव उपस्थित राहणार आहेत.
संकल्प -सिद्धी- उन्नती या ब्रीद वाक्यातून कै.नथ्थू आण्णा यांचा संकल्प प्रत्यक्ष सिद्धीस नेण्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी या संकल्पाचे प्रत्यक्ष साक्षीदार होऊयात यातून समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत होऊन त्यांच्या उन्नतीस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रीत्या हातभार लागणार आहे. प्रतिष्ठानच्या स्थापने नंतर ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक बाजू कमकुवत असल्याने शिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा मानस या प्रतिष्ठानने घेतला असून सदर विद्यार्थ्यांची आर्थिक बाजू बळकट झाल्यावर त्यांनी तो पैसा बिनव्याजी पाच वर्षानंतर प्रतिष्ठानला परत करावा . असा कै. नथ्थू आण्णा यांच्या संकल्प प्रत्यक्ष वृत्त स्वरूपात आणण्यासाठी या प्रतिष्ठानची स्थापना करण्यात येत आहे. त्याप्रसंगी रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.


अतिशय छान कार्यक्रम , आण्णांच्या जयंती निमित्ताने
होत आहे ,आयोजकांचे हार्दिक अभिनंदन , कार्यक्रमास
हार्दिक शुभेच्छा
अतिशय छान संकल्पना फक्त अखिल भारतीय बडगुजर समाज संघटनेत समाजकारणा पेक्षा जे राजकारण होते ते प्रतिष्ठानात होणार नाही एवढीच माफक अपेक्षा