शिरपूर शहर बडगुजर समाज महिलामंडळ तर्फे दिनांक 7/2/2024 रोजी शहरातील गुजर मंगल कार्यालय, निमझरी नाका, येथे हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीनगराध्यक्षा ताईसो.सौ. संगिताताई देवरे तसेच प्रमुख पाहुणे सौ. सीमाताईरंधे, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती सदस्या ,धुळे,सौ. माधुरीताई बडगुजर, सौ. साधनाताई बडगुजर यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे वअध्यक्षा यांनी प्रतिमापूजन केले त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात कु. रुत्विका विशाल बडगुजर हिच्या श्रीगणेश वंदना नृत्याविष्काराने करण्यातआली. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तद्नंतर बडगुजर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ वृषाली बडगुजर यांनी प्रास्ताविकातून हळदीकुंकू कार्यक्रममचा उद्देश व शिरपूर शहर बडगुजर समाज महिलामंडळ 2014 पासून सातत्याने हा कार्यक्रम साजरा करीत आहे हे स्पष्ट केले. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. त्यातसर्वप्रथम मा. सौ.सीमाताई रंधे यांनी महिलानी कशा प्रकारे आपलेआरोग्यावर लक्ष दिले पाहिजे यासाठी विविध उदा. देउन मार्गदर्शन केले. तसेच सौ. साधनाताई यांनी महिला नोकरी सांभाळून घर देखील उत्कृष्ट सांभाळत असतात पण त्याच बरोबर स्वत:च्या आरोग्यावर व आहारावर लक्ष दिले पाहिजे हे सांगून शिरपूर शहर बडगुजर समाज महिला मंडळाचे कौतुक करत रुपये 501 मंडळासाठी जाहीर केले. अध्यक्षीय भाषणात मा. सौ. संगिताताई देवरे यांनी उत्कृष्ट उदा. देउन जुन्या परंपरा आणि नवीनगोष्टीं यांची सांगड घालत समाजातील सर्व महिला कशा पद्धतीने कामकरू शकतात हे सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. हळदीकुंकूकार्यक्रमाबरोबरच उखाणे स्पर्धा घेण्यात आली. त्यात प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळविणार्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. प्रतिभा अर्जुन बडगुजर व सौ. संगिता विशाल बडगुजर यांनी केलले . तर आभार प्रदर्शन सौ. वंदना प्रमोदरघुवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या कार्याध्यक्षसौ. ज्योती सुनील बडगुजर , सदस्या सौ. शैला बडगुजर व सर्व महिलामंडळातील सदस्या यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे घडवून आणला. यावेळी शिरपूर शहर बडगुजर समाज मंडळातील मान्यवर उपस्थित होते. तसेच शहरातील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.