मित्रांनो,
आपण आज जगाच्या पाठीवर एकविसाव्या शतकात पदार्पण करीत असताना मला सांगायला खूपच आनंद होत आहे. कारण की तिन/चार दशकातल्या व आजच्या एकविसाव्या शतकात युगात जमीन आसमान चा फरक आपणांस प्रत्येकाला अनुभवायला मिळत असल्याने आपल्याला मान्यच करावे लागेल.
उदाहरण- कारण आजच्या आधुनिक उपग्रहाद्वारे (सॅटेलाईट) इंटरनेटमुळे प्रत्येक राज्यातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील आणि खेड्यातील जनजीवन, जनजागृती व माहिती प्रसारण हे इतके वेगाने क्षणार्धात प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहचवली जाते. हे भारतीय मानवाच्या प्रगतीचे एक पाऊल पुढे असताना बडगुजर समाजातील तरुणांनी आपला नोकरी व्यवसाय सांभाळून समाज सेवेसाठी स्वतः ला वाहून घेतले म्हणजेच बडगुजर.इन, बडगुजर वेब पोर्टल मध्ये दर दिवसाला एका क्षणात बातमी बडगुजर समाजातील अनेक लोकांना वाचायला मिळते. मग ती कोणत्याही प्रकारची असो परदेश गमन,नोकरी संदर्भ, निधनवार्ता, वाढदिवसाच्या शुभेच्छा, मैत्रीमोनीयल (लग्न संदर्भ) अशा अनेक नाना प्रकारच्या बातम्या बडगुजर वेब पोर्टल ने इंटरनेटच्या व व्हॉटसअॅप, व्हिडिओ माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवली जाते. ही समाजासाठी अभिमानास्पद बाब असून बडगुजर.इन, बडगुजर वेब पोर्टल टीम मध्ये काम करणाऱ्या सर्व तरुणांना त्रिवार सलाम व शुभार्शिवाद अशीच उत्तरोत्तर बडगुजर वेब पोर्टलची प्रगती होत राहो अशी परमेश्वरी चरणी प्रार्थना !!!
शुभेच्छूक: एस् एम् बडगुजर,डोंबिवली
धन्यवाद!


Leave a Reply