
नाशिक येथील श्री लक्ष्मण रामु बडगुजर लोहारीकर यांची नात, श्री. विजय लक्ष्मण बडगुजर हल्ली मुक्काम सावतानगर नाशिक यांची मुलगी हिने नुकत्याच सीए इंटरमिजिएट परीक्षेत दोन्ही ग्रुप मध्ये पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन करून परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

कु. विद्याची सीए होऊन भविष्य घडवण्याची इच्छा आहे. कु. विद्या हिने दहावीत 96.40% टक्के गुण संपादन करून घवघवीत यश मिळवले होते. चामुंडा माता युवक मित्र मंडळ नाशिक तर्फे तिचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला होता.
कु. विद्या ही हातगाडीवर भाजीविक्रेते श्री. विजय लक्ष्मण बडगुजर यांची कन्या असून. आई-वडिलांच्या अभिमान उंचावेल अशी दैदिप्यमान कामगिरी तिने करून दाखवली आहे. कु. विद्या हिच्या आईवडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड व बडगुजर डॉट इन वेबसाईट टीम मार्फत कु. विद्या हिचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा.


Ahinandan.far chhan.
हार्दिक अभिनंदन करतो. समा ज्यातील इतर होतकरू विद्यार्थी साठी आदर्श .दुर्मिळ यश प्रास.
पुढील वाटचालीस शुभेच्छा.