कुलकर्णीज् VRJ Production तर्फे आयोजित सांस्कृतिक स्पर्धेत सौ. संयोगिता बडगुजर – प्रथम व चि.कुशाग्र बडगुजर तृतीय – श्री. संदीप बडगुजर, चाळीसगांव

“Kulkarnis VRJ Production” आयोजित ” भव्य सांस्कृतिक स्पर्धेत सौ. संयोगिता बडगुजर यांनी सहभाग घेतला होता. विषय :- आई आई या शब्दा वर लिहीने म्हणजे आभाळ एवढा कागद व सागर एवढी शाई ही अपूर्ण ……. आहे. व त्यांनी अती सुरेख पद्धतीने व्यक्त केले आहे व खुप छान विचार प्रकट केलेआहे व त्यांना या स्पर्धेत प्रथम परितोषिक मिळाले.

सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आपल्या समाजातील दोघांनी या स्पर्धेत यश संपादन केले. सौ. संयोगिता बडगुजर या एक शिक्षिका आहेत. ज्यांनी विद्यादानाने अनेक विद्यार्थी घडविलेत. त्यांनी आई विषयी अतिशय सुरेख आणि सुंदर वर्णन केले. त्या व्हिडीओ ला सर्वात जास्त लाईक व शेअर केले गेले. एका आईने आई विषयी केलेले एक विस्तृत वर्णन केले आहे. सर्वांनी हा व्हिडीओ एकदा अवश्य पहावा.

https://youtu.be/8rBuO5UMcrl

तसेच याच स्पर्धेत इ.५ वी तील “चि.कुशाग्र” डॉ.सौ. चंचल प्रशांत बडगुजर व डॉ. प्रशांत संतोष बडगुजर यांचा सुपुत्र हा ‘पल दो पल दिल के पास तुम रहती हो…“ब्लॅकमेल” हिंदी चित्रपटातील गाणे (गायकःकिशोर कुमार) पियानोवर किती खुबीने आणि सुस्पष्ट आवाजात वाजविले आहे यांत त्याला तिसरा क्रमांक मिळाला. चि. कुशाग्र अतिशय हुशार विद्यार्थी असून अभ्यासासोबतच त्याला संगीताची पण आवड आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावरील त्याचा हा पहिलाच अनुभव आणि त्यात त्यांनी हे यश संपादन केले. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

आपण सर्व बडगुजर समाजबांधवांंनी आपले बहुमूल्य असे लाईक करून व शेयर करून विजयी बनविले व बडगुजर समाजाचे नांव हे द्विगुणित करत या स्पर्धेत विजयी झाले. आपले सर्वांचे असेच सहकार्य करत रहावे व समाजाचे नांव हे उज्वल होईल यासाठी आपल्या सर्वांच्या सहयोग व आपल्या प्रतिसाद आणि सहभागाची गरज आहे.

दोघा स्पर्धकांचे चाळीसगांव बडगुजर समाज मंडळ व आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज ओबीसी समिती, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! ??

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*