ll श्री गजानन प्रसन्न ll
गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली बडगुजर समाजाची नोंद
दि. 24 जानेवारी 2021 रोजी बडगुजर उत्कर्ष मंडळ मुंबई, अखिल भारतीय बडगुजर समाज कल्याण समिती व इतर सहयोगी संस्थां च्या वतीने ऐतिहासिक जागतिक डिजिटल वर-वधू परिचय ऑनलाइन मेळावा घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाण्याचे *आमदार माननीय श्री.संजय जी केळकर साहेब* यांच्या हस्ते करण्यात आले होते. या कार्यक्रमाची नोंद *गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक व लिमका बूक* मध्ये यावी यासाठी आपल्या मंडळाचे कार्यकर्ते *श्री.मदन कौतिक बडगुजर* यांनी अर्ज केला होता व या कार्यक्रमाचे सर्व सहकारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेऊन व कार्यक्रमाचे प्रचार व जाहिरात केली होती.
अहिराणी भाषेत, गुजराती भाषेत, इंग्रजी भाषेत, मराठी भाषेत व अनेक प्रकारच्या माध्यमातून विविध प्रकारे वर- वधू पालक या कार्यक्रमाचे शुभचिंतक व सर्व समाजाला या कार्यक्रमात ऑनलाइन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्रथमच आपल्या बडगुजर समाजात जागतिक मेळाव्याचे ऐतिहासिक ऑनलाइन संमेलन उभारले गेले.भारतातील कुठल्याही समाजाने एवढे मोठे ऑनलाईन संमेलन या अगोदर घेतलेले नाही त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ने अधिकृत नोंद त्यांच्या अधिकृत किताबा मध्ये करण्यात आले आहे. याची अधिकृत पोच आपल्याकडे त्यांनी ई-मेल द्वारे पाठवली आहे त्यामुळे बडगुजर समाजाच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यामुळे आपल्या बडगुजर समाजाची मान उंचावली आहे. याचे श्रेय आम्ही सर्व सहकारी मंडळाच्या कार्यकर्त्यांना देत आहोत. व यापुढेही बडगुजर समाजाची एकता अखंडता वाढवून मोठे कार्य करू या असा संकल्प करूया. बडगुजर उत्कर्ष मंडळाचे व सहयोगी संस्थांचे आम्ही जाहीर रित्या हार्दिक अभिनंदन करीत आहोत.
श्री.मोहन हिरालाल बडगुजर
अध्यक्ष- अ.भा. बडगुजर समाज कल्याण समिती
सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून करीत आहोत.
धन्यवाद!


So proud