श्री.प्रमोद तुकाराम बडगुजर यांचा सेवानिवृत्त समारंभ बीड येथे संपन्न – चन्द्रकांत बडगुजर ऐरोली

दि.२९ जानेवारी २१ महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग बीड यांच्या वतीने कार्यकारी अभियंता मा.श्री. प्रमोद तुकाराम बडगुजर यांच्या सेवानिवृत्त समारंभाचे आयोजन करण्यात आले.
सदर समारंभात शासकीय अधिकारी व सर्व कर्मचारी वर्ग तसेच कुठुंबातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.मालेगांव,नंदुरबार, बीड या जिल्ह्यात शासकीय सेवा झाली.
प्रमोद तुकाराम बडगुजर हे नाशिक येथे स्थायीक असून हे मुळ गांव म्हसावद येथील रहिवासी आहेत. स्व.तुकाराम दोधु बडगुजर यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत.बुद्धिमत्ता,संस्कार,मेहनत करत ते सन १९८४ प्रथम मालेगांव येथे शासकिय सेवेत सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले व सन २०१२ मध्ये कार्यकारी अभियंता म्हणून बीड येथे पदोन्नती वर रुजू झाले व या बीड जिल्ह्यात सेवा निवृत्त ही झाले.
या सेवकाळात शासकीय योजना चर्चासत्र, शासकिय प्रकल्प कार्यकुशलतेने शासनास सादर केली.
शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानीत केले. सुस्वभाव, शांत विचारांचे त्यांचे व्यक्तिमत्व असून प्रशासकीय सेवेतील अनुभव यामुळे त्यांचा सेवा काळ यशाचा शिखरावर होता. कौटुंबीक वातावरणात मातोश्री. गं.भा. उषाताई काका श्री व सौ. भास्करराव बडगुजर (निवृत्त कार्यकारी अभियंता) त्यांचे बंधु श्री.संदीप भाऊ बडगुजर ( सहाय्यक अभियंता नाशिक) श्री.अतुल भाऊ बडगुजर त्यांचे सुपत्र व पुत्र वधु असा सर्व परिवारा समोर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भावी वाटचाल, सुखमय, आरोग्यमय जावो अशा शुभेच्छा सर्वान कडून देण्यात आल्या

?शुभेच्छुक – बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, पाक्षिक बडगुजर दर्शन परिवार, प्राउड गृप व बडगुजर.इन वेब पोर्टल पुणे यांच्या वतीने शुभेच्छा?

1 Comment

  1. * श्री. प्रमोदजी बडगुजर ( नाशिक ),
    राम राम ,
    * आपण जीवन प्राधिकरण विभागात प्रर्दिघ शासकीय सेवा देवून ,कार्यकारी अभियंता पदावरून निवृत्त झालात !

    * या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन !

    * यापुढील आयुष्य आपणास सुख,समाधान व आरोग्य पूर्वक जावो ही परमेश्वर चरणी प्रार्थना !
    *

Leave a Reply

Your email address will not be published.


*