रिक्षा चालकांच्या मुलाने जिद्द व मेहनती ने उभारली बँक – श्री.हरीष बडगुजर पिंप्री खुर्द.

धरणगांव,पिंप्री खुर्द : येथील श्री.मधुकर नामदेव बडगुजर रिक्षा चालकाच्या मुलाने विपरीत परिस्थितीत मात करून पिंप्री खुर्द येथे बँक उभारून यश मिळवले आहे. वडिल हे रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करीत असे व आई ह्या आपले शेती व्यवसाय, मोलमजुरी करून आपले कुटुंब सांभाळत, आपल्या मुलांना आपल्या परिस्थिती प्रमाणे शिक्षण दिले.सौ. रत्नांबाई मधुकर पवार व श्री.मधुकर नामदेव पवार यांचा मुलगा आहे, बहीण अनिता मधुकर पवार, सौ.प्रियंका गणेश बडगुजर असा यांचा परिवार आहे.

सागर यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण झाले आहे व परिस्थिती वर मात करत त्यांनी मायक्रो फायनान्स मध्ये कलेक्शन चे काम करू लागले व हळूहळू तेथील कामाच्या अनुभव, व तेथील कलेक्शनचे काम करत असताना कोशल्य वापरीत प्रगती साधून प्रमोशन मिळवून शाखा व्यवस्थापक या पदावर नियुक्ती करण्यात आली. व ते कामही चोख प्रखरपणे करून सर्व टीम व लोकांशी संपर्कात राहुन सागर पवार हे शाखा व्यवस्थापकचे काम करत असताना त्यांनी स्वतः ची बँक टाकण्या चा निर्णय घेतला, यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले व अखेर २ वर्षाच्या प्रयत्नांना यश मिळाले. दि १५ ऑगस्ट २०२० रोजी श्री.चामुंडा मातेच्या कृपेने व आशिर्वादने हर्षप्रगती निधी बँक लि.या नावाने बँकची पिंप्री खुर्द येथे स्थापना केली… या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्री. गोपाल चौधरी,पिंप्री येथील सरपंच श्री. विजय सूर्यवंशी, माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते श्री.मंगल आण्णा, उपसरपंच श्री.देविदास चौधरी, पोलीस पाटील श्री. गोपाल बडगुजर, श्री.पी यु पाटील सर, श्री.निलेश बडगुजर , श्री.मधुकर श्रावण बडगुजर,श्री.चंदन बडगुजर,श्री.केवल पाटील, श्री.दिपक चौधरी व बडगुजर समाज, युवा मित्र मंडळ चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.


यासाठी संचालक श्री.मधुकर नामदेव पवार संस्थापक, चेअरमन चि.सागर मधुकर पवार आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज,अ.भा.ब.स.युवक समिती, बडगुजर प्राउड गृप,बडगुजर युवा संघटन सुरत व महिला गृप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडून मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ??

4 Comments

  1. चि.सागर मधुकर पवार-पिंप्री खु.
    यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!
    /डॉ बडगुजर अमरावती.

Leave a Reply

Your email address will not be published.


*