चोपडा येथील चि.गितेश काशिनाथ बडगुजर याचे MHTCET परिक्षेत नेत्रदीपक यश – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

*अभिनंदन.अभिनंदन.अभिनंदन!*
????????
चोपडा येथील काशिनाथ पुंजूशेठ बडगुजर,उपशिक्षक, जि.तो.महाजन माध्यमिक  विद्यालय,धानोरा ता.चोपडा यांचा मुलगा *चि.गितेश* , पंकज विद्यालय,चोपडा याने नुकत्याच जाहिर झालेल्या *MHTCET* परिक्षेत ९९.७७ टक्के गुण संपादन केलेत. चि.गितेश हा बहाद्दरपूर येथिल सामान्य शेतकरी श्री.पुंजू बुधा बडगुजर व सौ.कमलबाई तसेंच चोपडा येथिल कै.श्रीराम वामन करोडपती व सौ.सिंधूबाई यांचा नातू असून पिताश्री श्री के.पी.सर व माता सौ.सीमा बडगुजर यांच्या इच्छेनुसार,वैद्यकीय शाखेत आपले नशिब अजमावण्याचा मानस राखतो.

सौ. सीमा व श्री. के. पी. बडगुजर सर, चोपडा

चि.गितेश ने इ.१० वीत ९७.४०% व १२ वीत ८०%गुण संपादन केले असून तो मोठा बंधू जयेश(१०वी ९९.२०% महाराष्ट्रात दुसरा, १२वी ८८% गुण आणि सध्या डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय चा विद्यार्थी- इनफोसीस कंपनी तर्फे कॕम्पमध्ये निवड झाली)याचा अभिमान बाळगत पुढील ध्येय गाठणार आहे.

चि.गितेश व मातापित्याचे सर्वत्र-चोपडा व बहाद्दरपूर तसेंच जळगाव-धुळे जिल्ह्यातील आप्तेष्ठ,बडगुजर समाज बंधूभगिनी,तथा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चि. गितेश च्या उज्ज्वल भविष्याकरीता अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर.इन वेबसाईट यांच्या तर्फे अभिनंदन … आणि पुढील करिअर साठी शुभेच्छा !

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*