औरंगाबाद येथील चि. सुमित सुनिल गिरणार याचे MHTCET परिक्षेत उज्वल यश – श्री नरेंद्र सिताराम बडगुजर, औरंगाबाद

अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!
????????
औरंगाबाद, पडेगांव येथील श्री सुनिल पुंडलीक गिरणार, (प्रा. शिक्षक) व सौ संगीता सुनिल गिरणार (प्रा.शिक्षक) प्रा.जि.प. शाळा, देवगांव रंगारी यांचा मुलगा चि. सुमित, याने नुकत्याच जाहिर झालेल्या MHTCET परिक्षेत ९९.९१ टक्के गुण संपादन केलेत. चि.सुमित हा अमळथे, ता. शिंदखेडा येथील श्री.पुंडलीक देवराम बडगुजर (गिरणार) व तसेंच फागणे येथील श्री यशवंतर भिला बडगुजर (पढ्यार), निवृत्त शिक्षक यांचा नातू आहे. वडील श्री सुनिल सर व आई सौ संगीता बडगुजर यांच्या इच्छेनुसार व चि.सुमितची ही अभियांत्रिकी शाखेत आपले भविष्य घडविण्याची इच्छा आहे.

चि. सुमित ने इ.१० वी ९३% व १२ वी ८६% गुण संपादन केले असून तो मोठी बहिण स्नेहल (बीसीए) हिच्या मार्गदर्शनाने पुढील ध्येय गाठणार आहे.

चि.सुमित व मातापित्याचे सर्वत्र- औरंगाबाद, व फागणे तसेंच जळगाव-धुळे जिल्ह्यातील आप्तेष्ठ, बडगुजर समाज बंधूभगिनी,तथा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चि. सुमित च्या उज्ज्वल भविष्याकरीता बडगुजर समाज मंडळ -औरंगाबाद, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप आणि बडगुजर.इन वेबसाईट यांच्या तर्फे अभिनंदन … आणि पुढील शैक्षणिक वाटचाल करीता खुप खुप हर्दिक शुभेच्छा…!

चि. सुमितचे अभिनंदन करतांना आई वडील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*