डॉ. चारूस्मिता व डॉ. जतिन यांचा साखरपुडा समाज बांधिलकी जपून समारंभाचा नवा पायंडा…!

पनवेल येथील उद्योगपती श्री. भगवान लक्ष्मणशेठ बडगुजर यांची कन्या कु. डॉ. चारूस्मिता आणि सिडको मधील माजी वरिष्ठ अभियंते श्री. वासुदेव लक्ष्मणशेठ बडगुजर, नेरुळ  (मुळगाव धुळे) यांचे सुपुत्र डॉ. जतिन यांचा साखरपुडा, आज मंगळवार दि. २४ नोव्हेंबर २०२० रोजी, सायंकाळी ६ वाजता नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 

विशेष म्हणजे डॉ. चारूस्मिता या ‘कोविड योध्या’ असून लोकमान्य टिळक हॉस्पिटल (सायन हॉस्पिटल), मुंबई येथे त्या सेवा करत आहेत. तसेच  डॉ. जतिन हे नवी मुंबई येथील एम. जी. एम. हॉस्पिटल मध्ये अस्थिरोग (आर्थोपेडिक) तज्ञ म्हणुन सेवा करीत आहेत. त्यामुळे या सोहळ्याला विशेष महत्व आहे.

सध्याच्या जागतिक कोविड महामारीमुळे सर्वत्र सावधगिरी बाळगण्याची अपेक्षा असल्यामुळे तसेच शासकीय नियमांना बांधील राहण्यासाठी एक नवा पायंडा या कार्यक्रमाच्या निमित्ताने  डॉ. जतिन आणि  डॉ. चारूस्मिता पडणार आहेत… अर्थात या कार्यक्रमाचे थेठ प्रक्षेपण झूम  ऍप द्यारे करण्यात येणार आहे.

समाजातील बहुआयामी व्यक्तिमत्व बडगुजर उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष अ. भा. बडगुजर समाज महासमिती उपाध्यक्ष  श्री. भगवान शेठ विविध मार्गाने नवनवीन उपक्रमांना पाठिंबा देत असतात…  या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजून एक समाज-उपयोगी पायंडा पडला जाणार आहे जो खरंच भूषणावह आहे.


आपणही या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्तित राहून भावी उभयंतांना शुभ आशीर्वाद द्यावेत हि विनंती :

The engagement ceremony of Dr. CHARUSMITA & Dr. JATIN
Time: Nov 24, 2020 06:00 PM onwards… 

Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/4148683659?pwd=aUtIdnNoQ3NTNHU2NDFkVXc0di8rQT09

Meeting ID: 414 868 3659
Passcode: 12345
(तांत्रिक कारणाने मिटिंग ४० मिनिटांनंतर बंद झाल्यास पुन्हा त्याच लिंक ला कनेक्ट करावे) 

2 Comments

  1. खुप छान माहिती आहे ह्या आपल्या ग्रुप वर आपल्या समाजात अनेक मोठ्या व्यक्ती आहेत कारण समाजाची माहिती खूपच कमी लोकांना माहित आहे तरी आपले मनःपूर्वक आभारी आहोत

  2. Chi chatushila goad jiddi n mahatwakankshi talent Samaj kanya anekottam shubh ashirwad jodidar Dr Jatin yanche abhinandan

Leave a Reply

Your email address will not be published.


*