राज्यस्तरीय ऑनलाइन शुक्र चांदणी सौंदर्यवती स्पर्धेत सौ. शारदा बडगुजर व कु. देवयानी पठार यांचे घवघवीत यश – सौ. संयोगिता बडगुजर, चाळीसगांव

मराठमोळी दिवाळी माझी… निमित्त ठाणे येथील अश्विनी दैठणकर कलामंचच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृती वर आधारित, मराठमोळी केशभूषा व वेशभूषा परिधान करून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मराठमोळी शुक्र चांदणी ऑनलाईन सौंदर्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातून संख्येने महिला युवतींनी दिवाळीच्या काळात आपला सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेमध्ये कुमारिका व सौभाग्यवती गटाची विभागणी करण्यात आलेली होती.


सदर स्पर्धेत आपल्या बडगुजर समाजातील “चाळीसगाव येथील सौ. शारदाताई भानुदास बडगुजर व चोपडा येथील बीएससीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी कु. दिव्यानी महेंद्र पठार” यांनी देखील सहभाग नोंदविला होता. दोघी समाज भगिनींनी सदर स्पर्धेत मराठमोळी केशभूषा व वेशभूषा परिधान करून समाज जनहितार्थ संदेश दिला.
सदर स्पर्धेचे आयोजक अश्विनीताई दैठणकर, सदर स्पर्धेच्या ब्रँड अँबेसिडर, मॉडेल व अभिनेत्री पुणे येथील मोनिका बंगाळ तसेच आपल्या बडगुजर समाजातील सदर स्पर्धेचे ब्रँड अँबेसिडर व पर्यवेक्षक, अभिनेते व दिग्दर्शक अमितकुमार बडगुजर यांनी दिलेल्या निकालानुसार चाळीसगाव येथील शारदाताई भानुदास बडगुजर यांना सौभाग्यवती गटात चतुर्थ विजेतेपद मिळाले तर, कुमारिका गटात चोपडा येथील कु. देवयानी महेंद्र पठार यांनी द्वितीय विजेतेपद मिळविले.
सदर स्पर्धेतील विजेत्यांना मानाचा क्राऊन, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुढील आठवड्यात गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेत इतर विजेत्या मुंबई, पुणे, दौंड, कोपरगाव, संगमनेर नाशिक, अहमदनगर येथील आहेत.
आपल्या बडगुजर समाज भगिनी सह विजेत्या ठरलेल्या सर्व भगिनींचे चाळीसगाव बडगुजर समाज मंडळ, चोपडा तालुका बडगुजर समाज मंडळ, महिला मंडळ तसेच अ. भा. बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपतर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*