जळगांव प्रतिनिधी : दि. १०/११/२०२० रोजी स. १० वा. श्री रमेश आधार पाटील यांचे शेतात मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि., कढोली चे फलक अनावरण व कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीस नाना भाऊ महाजन –सदस्य जि.प. जळगाव,श्री मोहन भाऊ सोनवणे, सदस्य प.स. एरंडोल व इतर प्रमुख अतिथी यांच्या हस्ते फलक अनावरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे व उपस्थितांचा सत्कार झालेनंतर संस्थेचे संचालक श्री संजय जगन्नाथ बडगुजर यांनी प्रस्ताविक करून कढोली गावाच्या एतिहासिक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सेवा, संत /वैराग्य, सांस्कृतिक, देश सेवा इ. क्षेत्रात पूर्वीच्या पिढीने दिलेले योगदान या बाबत माहिती देवून गावाच्या विकासाचा जीवनपट सांगितला. गावाच्या मातीचे ऋण फेडणे व शेतकऱ्यांचा विकासासाठी शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली असे सांगितले.
श्री. अमोल सोनवणे – क्षेत्रीय तांत्रिक अधिकारी आत्मा यांनी शेतकऱ्यांचा समूह तयार करून त्यांची उत्पादनावर प्रक्रिया करणे त्यासाठी बाजारपेठ मिळविणे व उत्पादनाचे बाजार मुल्य कसे वाढवता येईल याची माहिती दिली.आत्मा योजनेतून कोणत्या योजनेचा कसा घेता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली.

श्री.भटू आबा पाटील रा.टाकरखेडा यांनी कंपनीचे उद्देश, फायदे व त्यांनी विविध शासकीय योजनेचे कशी सांगळ घालता येईल व शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा विकासासाठी चालविली शेतकरी उत्पादक कंपनी तून स्वताचा विकास या संकल्पना विषयी माहिती दिली.
श्री. नाना भाऊ महाजन -जि.प. सदस्य यांनी शेतकऱ्यांनी कष्टाने शेतीमाल उत्पादित करूनही स्वताची विपणन व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होते. त्यांना कोणीही वाली राहत नाही तसेच अस्तिवात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा पैशातून फार मोठ्या प्रमाणावर मालमत्ता असूनही त्या शेतकऱ्याच्या कामाच्या नाहीत. व त्यामुळेच सहकार क्षेत्रावर शेतकऱ्यांचा विश्वास राहिलेला नाही. कढोली हे काश्मीर सारखे नंदनवन आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा शोध घेवून कंपनीने शेतकऱ्यांमध्ये विश्वासाची सुरवात करणे आवश्यक आहे. शेतकरी गट किवा शेतकरी कंपनी स्थापन करून परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या योजनाचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण व्हावे इ. विषयी मार्गदशन केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी श्री नाना भाऊ महाजन – सदस्य जि.प. जळगाव, श्री मोहन भाऊ सोनवणे, सदस्य प.स.,एरंडोल, श्री संभाजी चव्हाण – सरपंच ग्रा.प. ,सावदे तथा उपसभापती- कृषी उत्पन्न बाजार समिती, धरणगाव, श्री अमोल सोनवणे – BTA कृषी विभाग, एरंडोल , श्री रमेश आधार पाटील – माजी उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, धरणगाव, श्री यशवंत (बापू) पाटील वैजनाथ, श्री नरेद्र बाळू पाटील- अध्यक्ष- सानेगुरुजी फौंडेशन, अमळनेर, श्री तुषार महाले- सचिव राष्ट्रविकास संस्था, अमळनेर, श्री भटूआबा पाटील, टाकरखेडे, श्री सुनील रामदास वाणी, अध्यक्ष- श्री अष्टविनायक संस्था, जळगाव प्रा. विनायक पाटील- कीटकतज्ञ, श्री भूषण लाडवंजारी- अध्यक्ष- तुळजाई संस्था, जळगाव , मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि., कढोली चे संचालक श्री संजय जगन्नाथ बडगुजर, श्री भिका नवल पाटील, श्री माधवराव रघुनाथ बडगुजर, श्री भास्कर शंकर बडगुजर, श्री नाना पंडित पाटील, श्री रविंद्र बडगुजर -सावदे, श्री रंगराव (नाना) बडगुजर, श्री दिगंबर बडगुजर -चिंचोली, श्री विकास सुधाकर जाधव, श्री मुकेश वना पाटील व कढोली, खेडी, रिंगणगाव, सावदे परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.


Leave a Reply