नाशिक शहरातील कु. राज किरण बडगुजर हा N.M.M.S या परीक्षेस विशिष्ट प्राविण्याने उत्तीर्ण….

बडगुजर पाऊल पडती पुढे, आपला बडगुजर समाज विविध क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करत आहे,त्याचा प्रत्येक समाज बांधवाला आभिमान आहेच.

नाशिक शहरातील सिडको या परिसरात राहणारा कु.राज किरण बडगुजर हा श्री. किरण मोतीलाल बडगुजर व सौ.ज्योती किरण बडगुजर यांचा चिरंजीव असून,तो जनता विद्यालय पवन नगर या शाळेतून इयत्ता आठवीत असताना NATIONAL MEANS CUM MERIT SCHOLARSHIP EXAMINATION 2019– 2020 या परीक्षेत Cat- OBC ( 31 selected OBC 3) रँकिंग 3 मध्ये विशिष्ट प्राविण्याने उत्तीर्ण झाला. त्याच्या या प्राविण्या‌मुळे त्याला केंद्रीय सरकार कडून दरमहा 1 हजार प्रमाणे असे 48 महिने म्हणजे 48 हजार रुपये स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र बडगुजर समाजात कौतुक केले जात आहे. या यशात त्याला शाळेचे शिक्षक तसेच मुख्याध्यापक व आई-वडिलांची मोठे योगदान लाभले आहे. कु. राज यास मिळालेल्या यशाबद्दल त्याचे अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व समस्त वेबपोर्टल टिम तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*