मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव हि संस्था गेल्या २० वर्षापासून संस्थापक अध्यक्ष श्री संजय जगन्नाथ बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. संस्था आज अखेरपर्यत केंद्र व राज्य शासनाच्या जल मृदसंधारण, कृषी, पर्यावरण, पाणी पुरवठा – स्वच्छता, जैवविविधता, उपजीविका इ. योजनामध्ये सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे. संस्थेने २०१८-१९ या वर्षामधे शालेय विद्यार्थामधे पर्यावरण विधायक जाणीव जागृती होण्याच्या दृष्टीने वर्षभर विविध प्रशिक्षण, चर्चासत्रे, मार्गदर्शन शिबिरांचे इ. पर्यावरण पूरक उपक्रमाचे आयोजन केलेले होते त्यांची जिल्हा स्तरीय राष्ट्रीय हरित सेना समितीने दखल घेवून संस्थेस २०१८-१९ चा वर्षात उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल “जिल्हास्तरीय पर्यावरण पूरक संस्था” म्हणून गौरविण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थ्यामधे पर्यावरण विषयक जाणीव जागृती करून पर्यावरण परिसंस्था संरक्षण व संवर्धन करून त्यामधे संतुलन ठेवणेसाठी केंद्रशासन “राष्ट्रीय हरित सेना” ही संकल्पना राबवीत आहे. राष्ट्रीय हरित सेना (National Green Crop) जिल्हास्तरीय समितीचे कामकाज मा. जिल्हाधिकारी अध्यक्ष तर मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सहअध्यक्ष व वनाधिकारी सा.व. विभाग, जळगाव हे जिल्हा नोडल ऑफिसर यांचे समिती द्वारा करणेत येते.
संस्थेस मिळालेल्या यशामधे संस्थेचे कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. सुधाकर लक्ष्मण बडगुजर, सचिव श्री राजेंद्र पितांबर बडगुजर, सदस्य इंजि.बालेश प्रल्हाद कोतवाल, श्री. भिका नवल पाटील, श्री. विकास सुधाकर जाधव यांचा मोलाचा सहभाग आहे.
जिल्हास्तरीय पर्यावरणपूरक संस्था म्हणून मातृभूमी सर्वांगीण विकास संस्थेस मिळालेल्या पुरस्काराबद्दल जळगांव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. रंगराव नथ्थु बडगुजर, श्री. हेमचंद्र निंबा बडगुजर, श्री. दिलीप महारू बडगुजर श्री. अविनाश पंडीत बडगुजर यांनी संस्थेच्या कार्यालयात जाऊन सस्थेचे अध्यक्ष श्री. संजय जगन्नाथ बडगुजर यांचा सत्कार केला.


Leave a Reply