सौ.प्रतिभा संजय बडगुजर यांची विभागीय मंडळ इतिहास शिक्षण परिषदेच्या सदस्यपदी निवड – रोहित बडगुजर धरणगांव

आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय , कानळदा ता. जि. जळगांव येथे गेल्या २० वर्षापासून सौ.प्रतिभा संजय बडगुजर या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. नुकतीच त्यांची नाशिक विभागीय मंडळ इतिहास शिक्षण परिषदेच्या सदस्य पदी निवड करण्यात आलेली असून सर्व स्तरावरून त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
१९९४ मध्ये संजय जगन्नाथ बडगुजर यांचे लग्न झाले तेव्हा बी. ए. बी. एड. ही पदवी त्यांचे कडे होती मात्र लग्नानंतर ही त्यांच्या मध्ये शिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा शक्ती होती. बी. ए. ला भुगोल हा स्वतंत्र विषय असल्याने प्रथम एम.जे. कॉलेज जळगांव येथे एम. ए. ला प्रवेश घेतला . बी. एड. पर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण झालेले होते व एम. ए. भूगोल इंग्रजी माध्यमातून असतांनाही प्रथम वर्गाने एम. ए. भूगोल उत्तीर्ण झाल्या . आपल्या समाजास राजकीय किंवा शैक्षणिक संस्थेच्या वारसा नसल्यामुळे भटकंती करूनही नोकरी पदरी नव्हती म्हणून पुन्हा एम.ए. इतिहास विषय जळगांव येथील नूतन मराठा महाविद्यालय येथे प्रवेश घेतला व १९९९ पर्यंत दोन विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व कानळदा ता. जि. जळगांव येथे २००१ मध्ये उच्चमाध्यमिक विद्यालया मध्ये इतिहास व भूगोल या विषयासाठी प्राध्यापिका म्हणून सेवेत दाखल झाल्या .


गेल्या २० वर्षांपासून प्रामानिक पणे व चोखपने विध्यार्थी घडविण्याचे काम ते करीत आहेत. त्यांचे फळ म्हणून नाशिक विभागीय मंडळ इतिहास शिक्षण परिषदेच्या सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
नुकतेच त्यांची कन्या हिने अमेरिकितील संगणक क्षेत्रात विद्यापीठाची एम. एस. या विषयामध्ये शिक्षण पूर्ण केले व तेथील जागतिक कंपनी मध्ये चांगल्या पदावर नोकरी मिळाली आहे हे विशेष आहे त्यामुळे बडगुजर समाजासाठी अभिमानाची गोष्ठ आहे.

आपल्याला अखिल भारतीय बडगुजर समाज, अ.भा.ब.स. युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर युवा संघटन सुरत व महिला ग्रुप ? जय चामुंडा माता हिरकणी? यांच्या कडुन मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा ??

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*