जळगाव:सेवक सेवाभावी संस्था कडून कोरोना महामारी च्या काळात ज्या समाज सेवक- सेविका यांनी सामाजिक दायित्व समजुन समाजोपयोगी कार्य केले अश्या सर्व कोरोना योद्धांचा सेवक सेवाभावी संस्था कडून जळगाव येथे महाराष्ट्र गौरव पूरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम च्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर श्री दिलीपजी चोपडा जळगाव तर प्रमुख अतिथी म्हणून समाज सेविका डॉ,निलीमा सेठिया जळगाव,मंदा पडवेकर चंन्द्रपूर,समाज सेवक दिपकजी जोशी, संघपाल तायड़े,जळगाव,कैलासजी शर्मा मालेगांव,सेवक सेवाभावी संस्था चे संस्थापक विशाल शर्मा ई मान्यवर मंचवर उपस्थित होते.

कोरोना महामारी च्या काळात वैद्यकीय कर्मचारी,पोलीस कर्मचारी,आरोग्य कर्मचारी,शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी यांनी तसेच सामाजिक कार्य करणार्या समाज सेवक -सेविका यांनी कोरोना विरोधात जो लढा दिला तो सर्वांसाठी प्रशंसनीय आहे, सर्वांच्या या कार्याची दखल घेत सेवक सेवाभावी संस्था कडून सर्वांना कोरोना योद्धा म्हणून महाराष्ट्र गौरव पूरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
प्रा. डॉ. नितीन बडगुजर यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांसह ग्रामीण भागात कोरोना संकटकाळात मास्क वाटप करणे मा जिल्हाधिकारी, जळगाव यांचे सोबत अर्सनिक अल्बम औषधी तयार करून त्याचे वाटप करणे त्याचप्रमाणे सामाजिक दूरत्व राखणे, शासकीय नियमांचे पालन करणे याबाबतची जनजागृती करून कृती कार्यक्रम आयोजित करणे व त्याची अंमलबजावणी देखील केली त्यांच्या वरील कार्याची दखल सेवक सेवाभावी संस्थेमार्फत घेण्यात येऊन त्यांना मानाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. आम्ही अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप समस्त वेबपोर्टल टीम तर्फे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.


Leave a Reply