श्री. विजयभाऊ बडगुजर यांच्या सामाजिक आणि वैद्यकिय क्षेत्रातील उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन मा.आ.चंद्रकांतदादा पाटील प्रदेश अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश व भाजपा वैद्यकिय आघाडी महाराष्ट्र प्रदेशाचे प्रभारी मा.आ.गिरीषभाऊ महाजन यांच्या आदेशाप्रमाण त्यांची महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडी नंदुरबार संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विजयभाऊ बडगुजर हे नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष, युवक समितीचे सचिव,बडगुजर प्राउड ग्रुप, बडगुजर. इन सह अनेक सामाजिक संस्थाच्या माध्यमातून कार्य करीत आहेत तसेच गेली अनेक वर्षा पासून वैद्यकिय क्षेत्रात अविरतपणे कार्यरत आहात.
या सेवेच्या माध्यमातून गोरगरीब जनता,रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी असलेला आपला सलोखा व सेवाव्रतीभाव लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकिय आघाडीचे संयोजक पदी आपली निवड करण्यात आली आहे.
आपल्या पुढील भविष्यातील कार्यास बडगुजर समाज उन्नती मंडळ, अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप,बडगुजर सेना तर्फे मनःपुर्वक शुभेच्छा.


Leave a Reply