कु. पायल बडगुजर हिची ICICI Bank Corporate Office, BKC, Mumbai येथे मॅनेजरपदी निवड
कु. पायल लहानपणापासूनच हुशार असून, तिने अभ्यासात सातत्यपूर्ण प्रगती करत विविध शिष्यवृत्ती व स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. S.S.C. आणि H.S.C. परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत तिने जळगाव जिल्ह्यात प्रथम, तर नाशिक विभागीय शिक्षण मंडळात तृतीय क्रमांक पटकावला होता. तिच्या या शैक्षणिक कामगिरीची दखल घेत बडगुजर उत्कर्ष मंडळ, ठाणे यांनी 2018 मध्ये तिला ‘आदर्श विद्यार्थिनी’ पुरस्काराने गौरविले होते.
अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत तिने प्रतिष्ठित College of Engineering, Pune (COEP) येथून B.Tech. पदवी पूर्ण केली. त्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटद्वारे Dentsu Global Services येथे निवड होऊन तिने दोन वर्षे नोकरी केली.
मात्र, व्यवस्थापन क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न तिने कायम जपले. नोकरी करत असतानाच मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर व्यवस्थापन प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवत तिने देशातील प्रतिष्ठित व्यवस्थापन संस्थांपैकी एक असलेल्या Jamnalal Bajaj Institute of Management Studies (JBIMS), Mumbai येथे Masters in Finance अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला. दोन वर्षांचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटद्वारे तिची ICICI Bank Corporate Office, BKC, Mumbai येथे Manager (Band-I) या पदावर निवड झाली.
कु. पायल ही अंमळनेर येथील निवृत्त पर्यवेक्षक श्री. संजय मगनराव बडगुजर आणि ‘बडगुजर क्लासेस’ च्या संचालिका सौ. शर्मिला बडगुजर यांची कन्या आहे. तिची मोठी बहीण सौ. हिरल कपिल पवार हिचीही स्पर्धा परीक्षेद्वारे निवड होऊन, ती EPFO या केंद्र सरकारी कार्यालयात Section Officer पदावर ठाणे येथे कार्यरत आहे. तिचा लहान भाऊ पुणे येथे MCAचे शिक्षण घेत आहे.
सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि स्वतःच्या ध्येयावर असलेला विश्वास यांच्या बळावर पायलने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

Leave a Reply