सन्मान मराठी प्रतिष्ठान खारघर नवीमुंबई संस्थेमार्फत कांदाभजी काव्यसंग्रह प्रकाशित – जेष्ठ समाज बांधव श्री. पंडित शंकरराव बडगुजर यांच्या कवितेचा समावेश – श्री. धर्मेंद्र पोपटराव बडगुजर, शिरपूर

सन्मान मराठी प्रतिष्ठान खारघर नवी मुंबई या संस्थेमार्फत ” कांदा भजी . ” या काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा दि १ ८ / २ / २० २४ रामशेठ ठाकूर पब्लिक स् खारघर येथे अत्यंत उत्साहाने करण्यात आला .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांचन ताई पालव होत्या .परमपूज्य सदगुरु वामन पै यांच्या त्या शिष्या आहेत . याप्रसंगी सुप्रसिद्ध हिंदी साहित्यिक व कवियत्री मिनू मदान ” तसेच खारघर येथिल खान्देश पुत्र नगरसेवक श्री किरण पाटील व सौ . सुनेत्रा पाटील उपस्थित होते.
श्री. कृष्णनाथ कुलकर्णी मराठी भाषा गौरव संस्थेचे संस्थापक यांनी पुस्तकाचे संपादन केले कार्यक्रमाला कवीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते .


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री पंडीतराव शंकरराव बडगुजर अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती माजी सचीव यांनी केले . त्यांची कविताही ” कांदा भजी” संग्रहालयात आहे .
या संग्रहालयाचे वैशिष्ट म्हणजे ४५ कवीयत्री व कवींनी आपल्या कविता सादर केल्या आहेत . हा एक साहित्य क्षेत्रात कुतूहलाचा विषय झाला आहे . प्रत्येक कविला ५ पुस्तकांचा संच भेट म्हणून देण्यात आला
” कांदा भजी ” कविता संग्रहालयाच्या प्रत्येक जिल्हातील प्रमुख ग्रंथालयात एक प्रत विनामूल्य पाठवण्यात आली आहे.
सन्मान मराठी प्रतिष्ठाण खारघर , नवी मुंबई या संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला . त्याबद्दल अखिल भारतीय बडगुजर समाज समाज कल्याण समिती व ओबीसी समितीकडून हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन करण्यांत आले आहे .

2 Comments

Leave a Reply to Bhagwan Girnar Cancel reply

Your email address will not be published.


*