इन्कम टॅक्स विभागात वर्ग दोन अधिकारी पदी कु.प्राजक्ता बडगुजर, पुणे येथे रुजू – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव

भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीजीएल {कम्बाईन ग्रॅज्युएशन लेव्हल} या परीक्षेत निवड झाल्यामुळे आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी कु. प्राजक्ता बडगुजर ह्या पुणे येथील मुख्य आयकर आयुक्त कार्यालयात वर्ग -2 अधिकारी पदी हजर झालेले आहेत..
यापूर्वी कु. प्राजक्ता बडगुजर यांना रिझर्व बँक ऑफ इंडिया,ग्रामीण डाक सेवक पोस्ट विभाग,केंद्रीय विद्यालय, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, इत्यादी ठिकाणी नोकरीच्या संधी मिळालेल्या होत्या..
सध्या त्या भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत सी.जी. एच.एस {सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम} पुणे येथे एल डी सी.पदावर कार्यरत होत्या.
कु.प्राजक्ता बडगुजर ह्या चिंचोली तालुका यावल येथील राहणारे व सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावडदा येथे कार्यरत प्राथमिक शिक्षक श्री. सुदाम बडगुजर यांच्या कन्या आहेत.
कु. प्राजक्ता बडगुजर यांच्या निवडी मागे अखंड व कठोर परिश्रम तसेच दृढनिश्चय या गोष्टी कारणीभूत आहेत.
कु.प्राजक्ता बडगुजर हिच्या निवडी मागे तिची आई सौ सुरेखा बडगुजर व वडील तसेच लहान भाऊ प्रफुल्ल बडगुजर सर्व शिक्षक .चिंचोली तालुका यावल येथील तिचे आजोबा चिंधू संपत बडगुजर कुर्हे पानाचे येथील राजाराम धोंडू बडगुजर विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री एन एफ बडगुजर सर राहणार चोपडा तसेच तिचे मामा श्री. सचिन व उमेश बडगुजर समाजातील सर्व कार्यकर्ते व वडीलधारी यांचे आशीर्वाद आहेत. कु. प्राजक्ता हिची पुणे येथील मुख्य आयकर आयुक्त कार्यालयात वर्ग -2 अधिकारी पदी रूजू झाल्याबद्दल तिचे बडगुजर. इन टिम व अ. भा. ब. स. युवक समिती यांचेकडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.


*