अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती तर्फे वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, वधुवर परिचय मेळावा समिती प्रमुख, अ. भा. ब. स. महासमिती

बडगुजर समाज बांधवांसाठी आनंदाची बातमी अखिल
भारतीय समाज महासमितीच्या वतीने बडगुजर समाजातील उपवर वधू वरां करिता लवकरच वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. साधारणता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वधू-वर मेळावा घेण्यात येणार आहे. सन 2017 नंतर प्रत्यक्ष वधू वर मेळावा घेण्यात आलेला नव्हता, मध्यंतरी कोरोना काळामध्ये सगळ्याच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्यामुळे वधूवर मेळाव्याचे नियोजन करण्यात आलेले नव्हते. तरी बडगुजर समाज महासमितीतर्फे येत्या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म उपलब्ध करण्यात येतील. ते फॉर्म उपवर मुला मुलींनी भरून घ्यायचे. या वधू वर मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी बडगुजर समाजातील सर्व बडगुजर समाज मंडळाचे सहकार्य घेण्यात येईल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वधू वर परिचय मेळावा समितीतर्फे लवकरच समिती सदस्यांची घोषणा करण्यात येईल वधु-वर परिचय मेळाव्यासंबंधीच्या सूचना वारंवार वधू वर परिचय मेळावा समितीकडून समाज बांधवांना देण्यात येतील. याची सर्वांनी नोंद घ्यावी. धन्यवाद.

अधिक माहितीसाठी संपर्क : श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर – 9421171469 वधुवर समिती प्रमुख, अ. भा. ब. स. महासमिती

1 Comment

  1. सर्वच समाजबांधव वरवधू परिचय समजमेलाव्याची आतुरतेने वाट पाहत होता बडगुजर समाज बहुउद्देशीय संस्था पुणे यांच्या माध्यमातून त्रिराज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात येते आहे अभिनंदनीय बाब आहे धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*