नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती:भाग👇४७👇- बडगुजर.इन

नर्मदा परिक्रमा:एक विलक्षण अनुभूती:भाग👇४७.👇

*नर्मदे हर हर…

*तर मागच्या भागात मी सांगत होते लाल पुरी बाबांच्या कडून बाहेर पडल्यावरचा अनुभव.मी स्लीपिंग बॅग लाल पुरी महाजांना दिली होती आणि आता माझ्याजवळ पांघरायला काहीही नव्हतं. आम्ही बाहेर निघालो आणि थोड्याच वेळात एक माणूस माझ्या पुढे येऊन उभा राहिला… तो जे काही बोलला ते ऐकून मी रडूच लागले, मटकन खालीच बसले असं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होत, तर असं काय झालं होतं ते आता सांगते. तर आम्ही निघालो, वाटेत एक कार आम्हाला बघून थांबली. एक पन्नास पंचावन वयाचा माणूस खाली उतरला. नर्मदे हर झालं, आणि त्याने मला प्रश्न केला “मैयाजी, मुझे आपको कुछ देना है, आप ले कर जाओगे क्या?”

*परिक्रमावासीयांची सेवा म्हणून बहुतेकदा लोक शिधा देतात. मागे एकदा एका भाविकाने मला खूप शिधा दिला होता त्यात २ किलो तांदूळ,एक किलो डाळ, तेल मीठ मसाले,असं सगळं दिलं आणि आमच्या सामानासोबत ते वाहून नेणं आम्हाला कठीण होऊ लागलं होतं, म्हणून तो अनुभव गाठीशी ठेवूनच मी उत्तर दिलं “बाबा जी, आपको मना नही करेंगे लेकीन ऐसा कुछ मत दिजीयेगा जो हमे लेकर जाने मे भारी हो जाये, बाकी आपकी श्रद्धा का सम्मान तो हमे करना ही है” त्याने पण लगेच सांगितलं की जे काही तो मला देणार आहे ते अगदी हलकं आहे आणि आमच्या कामात पडणार आहे. तो म्हणाला, “ नही मैयाजी, एकदम हलका है और आपको जरूर काम आयेगा, बस एक बात है, बाबाजी के लिये नाही है, सिर्फ आपके लिये है, बाबाजी को हम चाय पिलायेंगे लेकीन जो देंगे वो तो आपकेही काम की चीज है, उसे आप ही रखीयेगा”. मनात विचार केला असं काय देणारे बाबा हा? बघू, “

*ठीक बाबा जी, दे दो”….. त्यांनी मला काय द्यावं हो? विश्वासच बसणार नाहीये तुमचा… आणि हे ऐकून माझी अवस्था काय झाली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता… सांगते.. तो माणूस कार पाशी गेला, एक पांढ-या रंगाची चांगली मोठी प्लास्टिक ची पिशवी घेऊन आला आणि म्हणाला “मैयाजी दो कम्बल है, हलकी है बोहोत, लेडीज वाली है और ल्म्बाई थोडी कम है, पार आपको आ जायेगी, बाबा जी को छोटी हो जायेगी.

*आप लोगे तो मन को शांती मिल जायेगी” … मी आताच लाल पुरी बाबांच्या आश्रमातून निघाले होते, माझी स्लीपिंग बॅग त्यांना देऊन.. आणि तासाभरातच कसा काय माणूस भेटावा माला, ते ही दोन फ्लीस ब्लँकेट्स घेऊन..आणि ते ही फक्त माझ्यासाठी?…मी ती पिशवी हातात घेतली आणि मटकन खालीच बसले, रडूच लागले. कसं? कसं तिला कळतं मला कशाची गरज आहे ते? कसा हा माणूस अगदी आजच मला भेटावा?

*याच्या जवळ माझ्या गरजेचीच गोष्ट नेमकी कशी असावी? नेमकी माझ्याच गरजेची? मी आणि बाबा दोघं ही होतो तिथे, पण बाबा ला द्यायला ह्याच्याजवळ काही नव्हतं आणि मला देण्यासाठी होतं, तेच जे मला प्रवासात लागणारे!!

*मी शांत झाले आणि ठरवलं, विचारायचं याला, कुणी सांगितलं रे बाबा तुला जा आणि हिला मदत कर म्हणून? असा कसा आलास तू अगदी देवासारखा माझ्या गरजेची वस्तू घेऊन?… विचारलं मी, तर म्हणाला, “घर के लिये लेकर जा रहा था, आपको दूर से ही देख लिया था, अचानक खयाल आया, आप परिक्रमावासी काफी कष्ट उठाते हो, सोचा आपके पास ओढने के लिये कूछ होगा भी या नही? आपको देखा मैने मैया जी और मन किया बस, ये तो आपको ही देना चाहिये, फिर क्या एक बार आपको देने का खयाल मन मे आया तो अब तो आपको देना ही था, घर के लिये और ले लुंगा बाद मे.” त्याचं हे बोलणं ऐकून मी तर निःशब्द झाले होते… हे सगळं कसं होतं ते कधीच समजत नाही आपल्याला, आणि हे असं होतं हे ती दाखवत जाते,नेहमीच…आम्ही पुढे निघालो.
क्रमश:भाग ४८
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

  _*

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*