आज १२ ऑगस्ट:🐘 जागतिक हत्ती🐘दिन – बडगुजर.इन

आज १२ ऑगस्ट:🐘 जागतिक हत्ती🐘दिन.
*जगाला हत्तींचे संरक्षण आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी जागरूकता निर्माण,होण्यासाठी १२ ऑगस्ट रोजी जागतिक🐘हत्ती🐘दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक हत्ती दिनाचे उद्दीष्ट आफ्रिकन आणि आशियाई हत्तींच्या तात्काळ दुर्दशाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि जंगली आणि बंदिवान हत्तींची उत्तम काळजी आणि व्यवस्थापन विषयी माहिती सामायिक करणे होय.!
“जागतिक हत्ती दिन” अनेक वन्यजीव संघटना आणि जगभरातील अनेक देशांत साजरा केला जातो.

हत्ती 🐘 विषयी काही रोचक तथ्यें: हत्ती घनदाट जंगलात मार्ग बनवतात ज्याचा वापर इतर प्राणी करतात.हत्ती अन्नाचे शौकीन आहेत आणि दिवसभरात सुमारे १६ तास खाण्यासाठी घालवतात.चिखल हत्तींसाठी सनस्क्रीन म्हणून काम करतो,म्हणून हत्ती चिखलात लोळतात.

आफ्रिकन 🦣हत्ती हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे.

हत्ती 🐘पर्यावरणीय जैवविविधता राखण्यास मदत करतात.

हत्ती एका दिवसात ८०-८५ गॅलन पाणी पिऊ शकतात.

हत्तींना खूप कमी जुळे असतात.

🐘हत्तींना त्यांची सोंड चोखण्याची सवय असते.

साधारणत:१३-१४वर्षांच्या वयात हत्ती लैंगिक परिपक्वता प्राप्त करतात.

मादी🐘हत्ती सुमारे ५० वर्षांची होईपर्यंत प्रजनन करू शकतात.

🐘हत्ती त्यांच्या सोंडेने रंगवू शकतात.हत्तीच्या बाळाचे शरीर लहान केसांनी झाकलेले असते,शारीरिक विकासासह,या केसांची वाढ देखील घटते,जाड असूनही,🐘हत्तीची त्वचा अतिशय संवेदनशील असते.

लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना या प्राण्याबद्दल विशेष आत्मीयता वाटते. लहानपणी शिकवल्या जाणाऱ्या चित्रांमध्येसुद्धा पिढ्यान् पिढ्या हत्तीचे कार्टून काढले जाते आहे.आपल्या सणांमध्ये,संस्कृतीमध्ये, आराध्य दैवत असलेल्या गणपतीच्या आख्यायिकेमधे 🐘हत्तीला विशेष स्थान आहे. पूर्वजांनी तर रानटी हत्तींवर पाळीव प्राण्यांचे संस्कार करून लढाईमध्ये हत्तींना वापरले होते.जगात सध्या आफ्रिकन आणि आशियाई हे हत्तींचे दोन प्रमुख प्रकार बघायला मिळतात.सर्वाधिक🐘हत्ती हे आफ्रिकेत असून शंभर वर्षांपूर्वी त्यांची संख्या तीस लाखांहून अधिक असल्याचे संदर्भ सापडतात.

हत्ती व माणूस यांच्यात एक सकारात्मक नाते आहे: हत्तीला (elephant memory) एकदा पाहिलेल्या गोष्टीचे कधीच विस्मरण होत नाही. त्यामुळेच त्याचे पालनपोषण केलेल्या माहुतावर तो हल्ला केल्याच्या घटना ऐकण्यात येत नाही. गेल्या काही वर्षांत हा प्राणी अस्तित्वाची लढाई लढतो आहे. सध्या हस्तीदंताला मिळणाऱ्या रुपयांमुळे तो आंतरराष्ट्रीय तस्करांच्या रडारवर आहे. धक्कादायक बाब म्हणजे दर पंधरा मिनिटाला एका हत्तीची शिकार (elephant hunting) होत असल्याचे ‘इंटरनॅशनल फंड फॉर अॅनिमल वेल्फेअर’ संस्थेच्या सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.

🐘हत्तीला एकदा पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीचे विस्मरणच होत नाही हे बरोबर आहे.कारण हत्तींची स्मरणशक्तीच चांगली असते. किंबहुना इतर अनेक प्राण्यांपेक्षा ती चांगली, हेही खरे! एवढेच नव्हे तर एखाद्या माणसाने हत्तीला काही दुखापत केली असेल व त्यानंतर अनेक वर्षांनी त्या हत्तीला तो माणूस दिसला तरी हत्तीने त्याच्यावर हल्ला केल्याची उदाहरणेही आहेत. इंटरनॅशनल ट्रेड इन एनडेन्जर्ड स्पेशीज ऑफ वाइल्ड फौना अँड फ्लोरा’ या (सिटीज) या संस्थेने 1989 मध्ये धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या यादीत हत्तींचा समावेश केला.त्यानंतर जागतिक स्तरावर हत्तींच्या शिकारीची गांभीर्याने चर्चा सुरू झाली.’प्रोजेक्ट एलिफंट’ देखील जाहीर झाले आहेत.भारतात हत्तीला धार्मिक महत्त्वही आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर लोक हत्तीच्या जिवावर उठले आहेत.शोभीवंत वस्तूंसाठी त्यांना हत्तीचे🦣दात हवे असतात.त्यामुळे तस्कारी केली जाते. मात्र,आता या देखण्या प्राण्याला वाचविण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
स्त्रोत:गूगल/इंटरनेट.
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🐘🦣🐘🦣🐘🦣🐘🦣🐘🦣🐘🦣🐘🦣🐘

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*