१२ ऑगस्ट: दिनविशेष
ll👉महत्त्वाच्या घटना👈ll
१८३३: अमेरिकेतील शिकागो शहराची स्थापना करण्यात आली.
१८५१: आयझॅक सिंगरला शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले.
१८८३: शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला.
१९०८: हेनरी फोर्ड यांच्या कार कंपनीने पहिल्या आपल्या पहिल्या गाडीचे मॉडल तयार केले.
१९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी ’स्वराज्य’ नावाचे साप्ताहिक सुरू केले.
१९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या ’राजसंन्यास’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९४२: चले जाव चळवळ:पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून गोळीबार,२ ठार १६ जखम.
१९४८: लंडनमधे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने हॉकीमधे सुवर्णपदक मिळवले.
१९५०: अमेरिकन युद्धकैद्यांना उत्तर कोरियन सैन्याने ठार मारले.
१९५२: मॉस्कोमधे १३ ज्यू विद्वानांची हत्या
१९५३: पहिल्या थर्मोन्युक्लिअर बॉम्बची चाचणी करण्यात आली.
१९६०: नासा च्या पहिल्या संचार उपग्रह इको–१ ए चे यशस्वी प्रक्षेपण झाले.
१९६४: वंशभेद केल्याबद्दल दक्षिण अफ्रिकेची ऑलिम्पिक स्पर्धांमधुन हकालपट्टी झाली.
१९७७: श्रीलंकेत झालेल्या वांशिक दंगलीत ३०० हुन अधिक तामिळ ठार झाले.
१९८१: आय.बी.एम. कंपनीचा पहिला पर्सनल कॉम्प्युटर बाजारात आला.
१९८२: परकीय कर्जाचे हप्ते चुकवता येत नसल्यामुळे मेक्सिकोने दिवाळे काढले. त्यामुळे दक्षिण अमेरिका व तिसर्या जगातील देशांमधे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.
१९८९: कुसूमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ’जागतिक मराठी परिषद’ मुंबई येथे सुरू झाली.
१९९०: दक्षिण डकोटा मध्ये सु हॅन्ड्रिकसन यांना सर्वात मोठा आणि सर्वात संपूर्ण टायरनोसॉरस रेक्स चा हाडांचा सापळा सापडला.
१९९५: जागतिक मैदानी स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल जॉन्सनने २०० मी आणि ४०० मी अशा दोन्ही धावण्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळवले,अशी कामगिरी करणारा तो पहिलाच पुरुष धावपटू आहे.
१९९८: सचिन तेंडुलकर याला ‘राजीव गांधी खेल रत्न‘ पुरस्कार जाहीर
२०००: प्रसिद्ध पर्यावरणवादी कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची गांधी सेवा पुरस्कारासाठी निवड
२००२: १२ वर्षे ७ महिने वयाचा सर्गेई कार्जाकिन हा युक्रेनचा खेळाडू जगातील सर्वात लहान वयाचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर बनला.
२००५: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कादिरमगार यांची तामिळ अतिरेक्यांनी हत्या केली.
जन्मदिवस/👇वाढदिवस
१८०१: जॉन कॅडबरी – ब्रिटिश उद्योगपती व ’कॅडबरी’ चे संस्थापक (मृत्यू: १२ मे १८८९)
१८६०: एडॉल्फ हिटलर यांही आई क्लारा हिटलर यांचा जन्म.(मृत्यू: २१ डिसेंबर १९०७)
१८८१: सेसिल डी.मिल – अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक (मृत्यू: २१ जानेवारी १९५९)
१८८७: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४जानेवारी १९६१)
१८९२: एस.आर.रंगनाथन: भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (मृत्यू:२७ सप्टेंबर१९७२)
१९०६: लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात यांचे निधन. संयुक्त राष्ट्रसंघाने शांतता प्रस्थापनेसाठी कोरियात पाठवलेल्या शांतिसेनेचे ते सेनापती होते. कीर्तिचक्र, पद्मश्री, सावरकर पुरस्कार असे अनेक मानसन्मान त्यांना मिळाले होते. (मृत्यू: १० ऑगस्ट १९९२)
१९१०: सिंगापूरचे पहिले अध्यक्ष यूसुफ बिन इशक यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९७०)
१९१९: डॉ. विक्रम साराभाई–पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय अंतराळ संस्थेचे जनक,भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: ३१ डिसेंबर १९७१)
१९२४: मुहम्मद झिया उल हक–पाकिस्तानचे ६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १७ ऑगस्ट १९८८)
१९२५: गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस् चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७५)
१९२६: बी. आर. तथा अप्पासाहेब खेडकर – गणेशमुर्तीकार ते शिल्पकार असा प्रवास करणारे कलाकार, राष्ट्रीय नेत्यांच्या शिल्पकृतींपासून अगदी ’मुगल-ए-आझम’ चित्रपटाच्या सेटवरील शिल्पांपर्यंत त्यांनी कारकीर्द गाजवली, कलाकारांचे हुबेहूब मुखवटे तयार करुन ते डमी म्हणून वापरण्याचा प्रयोग त्यांनीच सुरू केला.
१९४८: फकिरा मुंजाजी तथा ’फ.मुं.’शिंदे–कवी,समीक्षक व अनुवादक
१९५९: प्रवीण ठिपसे–अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बुद्धिबळ पटू
मृत्यू/पुण्यतिथी👇स्मृतिदिन:
१९४५: थेओसोफिकल सोसायटीचे अध्यक्ष व लिबरल कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू भारतीय इंग्रजी क्रांतिकारक जॉर्ज सिडनी अरुंडेल(George Arundale) यांचे निधन.
लक्ष्मण कादिरमगार
१९६४: इयान फ्लेमिंग – दुसर्या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि ’जेम्स बाँड’चा जनक (जन्म: २८ मे १९०८)
१९६८: बाळशास्त्री व्यंकटेश हरदास-नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य
१९७३: दयानंद बाळकृष्ण ऊर्फ ’भाऊसाहेब’ बांदोडकर–गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती आणि दानशूर (जन्म: १२ मार्च १९११)
१९८२: हेन्री फोंडा–अमेरिकन अभिनेते (जन्म:१६ मे १९०५)
१९८४: आनंदीबाई जयवंत–कवी,समीक्षक व अनुवादक
२००५: लक्ष्मण कादिरमगार – श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री, मुत्सद्दी, वकील व तामिळ नेते (जन्म:१२ एप्रिल १९३२)
स्त्रोत:गूगल/इंटरनेट.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


Leave a Reply