आज ४ ऑगस्ट: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर, स्थापना शताब्दी वर्ष – बडगुजर. इन

आज ४ ऑगस्ट: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर, स्थापना शताब्दी वर्ष.
शंभर वर्षांपूर्वी आजच्या दिनी नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,(पूर्वीचे नागपूर विद्यापीठ)महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे.ही एक मध्य भारतातील प्रमुख शिक्षण संस्था आहे.नागपूर जिल्ह्यातील(तसेच नागपूर शहरातील)सर्व महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संस्थेबद्दलचा मराठी विकिपीडिया वरील केवळ विश्वकोशीय लेख आहे.
ब्रीदवाक्य:विद्या परंदैवतम्
इतिहास: नागपूर विद्यापीठाची स्थापना ४ ऑगस्ट १९२३ रोजी झाली.सर फ्रॅक स्लाय हे त्या वेळेचे कुलपती होते. या विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू सर बिपिनकृष्ण बोस हे होते.त्या वेळेस फक्त ६ महाविद्यालये,९१७ विद्यार्थी,व फक्त ४ विद्याशाखा या पुंजीवर हे विद्यापीठ सुरू झाले.एका मोठ्या कालावधीनंतर २००५ साली विद्यापीठाचे नाव बदलण्यात आले.
वैशिष्ट्ये: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारलेला अभ्यासक्रम सुरू करणारे हे पहिले विद्यापीठ आहे.एका स्वतंत्र विभागाद्वारे महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारलेला अभासक्रम सुरू करण्याचे श्रेयही या विद्यापीठास जाते.
परिसर ग्रंथालय: परिसर ग्रंथालय हे विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयाची शाखा आहे. ते अमरावती रोड येथील विद्यापीठ परिसरात स्थित आहे.५ डिसेंबर १९७८ रोजी ग्रंथालयाच्या स्वतंत्र वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालयात ग्रंथ देवघेव, नियतकालिके, संगणक,हस्तलिखिते इत्यादी विभाग स्वतंत्रपणे कार्यरत आहेत.
विद्यापीठात महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४च्या कलम ७५(आय)नुसार ग्रंथालयीन प्रशासन, संघटन, नियंत्रण,परीक्षण,आधुनिक तंत्रज्ञान व सेवा, नियम इत्यादींबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता अध्यक्ष व १० सदस्य अशी ११ लोकांची ग्रंथालय समिती स्थापन करण्यात आली. समितीमार्फत ग्रंथालयाचे दैनंदिन कामकाज,योजना, अंदाजपत्रक,वार्षिक अहवाल, ग्रंथालयीन समस्या इत्यादींबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन अमलबजावणी करण्यात येते.२०१४ मध्ये ‘नॅक’ या संस्थेकडून विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे.
समीक्षक:संतोष गेडाम
स्तोत्र:गुगल/इंटरनेट…
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
📔📕📗📚📘📙📒📘📙📒📚📔📕📗
सावरकर,नेहरू,इंदिरा गांधींना कुणी दिली होती डी.लिट: जागतिक कीर्तीच्या मान्यवरांना डी.लिट.मानद पदवीने गौरवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गुरुवारी आपल्या शतकोत्तर वर्षात पाऊल ठेवणार आहे.
या विद्यापीठाने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर,माजी पंतप्रधान इंदिरा गांधींसह अनेक नामवंतांनाडी.लिट. पदवीने सन्मानित केले आहे.
४ ऑगस्ट १९२३ ला नागपूर विद्यापीठाची स्थापना झाली. आज ४ऑगस्ट २०२४ रोजी,नागपूर विद्यापीठ आपली शंभर वर्षे पूर्ण करणार असून गुरुवारपासून विद्यापीठाच्या शतकोत्तर वर्षाला सुरुवात होणार आहे.विद्यापीठाने समाजातील मान्यवरांचा वेळोवेळी गौरव केला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना 1943 मध्ये वाङ्मय पंडित ही पदवी देऊन गौरवण्यात आले.पं.नेहरू यांना 1950 मध्ये कायदे पंडित ही पदवी बहाल करण्यात आली. तसेंच विजया लक्ष्मीपंडित, लोकनायक एम.एस.अणे, इंदिरा गांधी,बाबा आमटे,लता मंगेशकर,डॉ.विजय भटकर आदींना डी.लिट.ही पदवी देऊन गौरवण्यात आले.
स्तोत्र:गुगल/इंटरनेट
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂🪂

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*