आज ४ ऑगस्ट:नारायण सीताराम फडके यांची १२९ वी जयंती.
ना.सी.फडके,हे मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक होते.ते कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते.सन १९४९ मध्ये ते येथून निवृत्त झाले. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत.आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत,अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे.तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे.एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते.फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात,त्या केवळ मनोरंजन करतात,मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत,आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत.असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई,मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य,विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते.
ना.सी.फडके:वैयक्तीक माहिती
जन्म नाव:नारायण सीताराम फडके_
जन्म:४ऑगस्ट१८९४,कर्जत._
मृत्यू: २२ऑक्टो१९७८,पुणे
राष्ट्रीयत्व:भारतीय_
कार्यक्षेत्र: साहित्य,अध्यापन
भाषा: मराठी
साहित्य प्रकार: कादंबरी
वडील:सीताराम फडके._
अपत्ये:अंजली,रोहिणी
अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी.मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. लेखिका कमला फडके (माहेरच्या कमल दीक्षित)या ना.सी. फडके यांच्या विद्यार्थिनी आणि द्वितीय पत्नी.त्यांच्या एका मुलीचे नाव अंजली.फडके यांनी अंजली प्रकाशन नावाची संस्था काढली होती. या प्रकाशन संस्थेद्वारा ते दरवर्षी ’अंजली’ नावाचा वासंतिक आणि दिवाळी अंक प्रसिद्ध करीत असत.
फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून,त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२)ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत.त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत.
त्यांच्या कलंकशोभा या कादंबरीवरून त्याच नावाचा एक चित्रपटही निघाला होता.
सन्मान: रत्नागिरी येथे १९४० साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना देण्यात आला होता. १९६२ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला होता.त्यांचा नावाचा पुरस्कार दरवर्षी एका उत्तम साहित्यकृतीला देण्यात येतो.
कुटुंब नियोजन आणि युजेनिकसचे समर्थन: १९२०च्या दशकात फडक्यांनी भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जन्मदर नियंत्रण आणि युजेनिक्स,यांचे जोरदार समर्थन केले. १९२७ मध्ये त्यांनी ‘भारतातील लैंगिक समस्या’ या विषयावर प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी अमेरिकेतील कुटुंब नियोजनाच्या सुप्रसिद्ध समर्थक,श्रीमती मार्गारेट सेंगर ह्यांनी प्रस्तावना लिहिली होती. “Birth Control Review” नावाच्या नियतकालिकात देखील ह्या विषयावरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले होते.
थोर साहित्यिक ना.सी. फडके,यांच्या १२९ व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन.🌹
स्तोत्र:गुगल/इंटरनेट…
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


Leave a Reply