श्री. राजेंद्र महादेव पवार सर हे ज्ञानदानाचे कार्य करुन सेवानिवृत्त – श्री. निलेश पवार, पिंप्री

एरंडोल येथील श्री. राजेंद्र महादेव पवार सर आज ३४ वर्ष ज्ञानदानाची सेवा करून श्री. संत हरिहर महाराज माध्यमिक विद्यालय, निपाणे ता.एरंडोल येथून सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक आदर्श विद्यार्थी घडविले. त्यांच्यावर सुसंस्कार केले. कोणाशीही वैर द्वेष भावना न ठेवता सर्वांची मने जिंकली. बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ एरंडोल चे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन विद्यालयात मार्फत करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष श्री.संजय तोताराम पाटील होते.मंचावर विद्यालयाचे उपाध्यक्ष, सचिव, व सदस्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.महाजन सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीं उपस्थित होते.
यावेळी श्री.राजेंद्र पवार सर यांचा सपत्नीक संस्थेचे अध्यक्ष .श्री. संजय पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. ‌त्याचप्रमाणे शाळेच्या वतीने मा.मुख्याध्यापक श्री.महाजन सर व सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या हस्ते श्री.राजेंद्र सरांचा शाल, श्रीफळ, कपडे आणि मॅडमना साडी व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात येऊन सरांच्या पुढील आयुष्य आनंदी व सुखसमृद्धीचे जावो अशा शुभेच्छा सर्वांनी दिल्या.श्री. राजेंद्र पवार सरांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना पेन आणि सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. श्री राजेंद्र सर यांचे शिक्षण हे बी. ए. बी. एड. झाले असुन ते प्रथम ज्ञानदान ची सुरुवात प्रथम प्रियदर्शनी हायस्कूल जळु ता. एरंडोल येथुन सुरू झाली व अविरत पणे ३४ वर्ष ज्ञानदानाची सेवा करून ते सेवा निवृत्त झाले. सरांना दोन मुले एक मुलगी आहे मोठा मुलगा निखिल आयटी क्षेत्रात इंजिनियर आहे मुलगी आताच M.Pharm Niper 2023 परीक्षेत उत्तीर्ण झाली. लहान मुलगा शिक्षण घेत आहे. श्री. राजेंद्र महादेव पवार सर यांना अखिल भारतीय युवक समिती, बडगुजर. इन, प्राऊड ग्रुप, बडगुजर युवा संगठन सुरत, 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 यांच्या कडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा!
🌹🌹

श्री. राजेंद्र महादेव पवार सर – 94215 23612

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*