आज 31 जुलै…देशातील पहिला मोबाईल कॉल… – बडगुजर. इन

आज 31 जुलै…

देशातील पहिला मोबाईल कॉल…

“…….नमस्ते सुखरामजी… कैसे है आप….

भारतातील तो पहिला कॉल
पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योति बसू यांनी 31 जुलै 1995 रोजी पहिला मोबाईल कॉल केला होता. त्यांनी यावेळी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कोलकाता ते दिल्ली असा हा कॉल झाला होता. बसू यांनी कोलकाता रॉयटर्स इमारतीतून दिल्लीतील संचार भवनला हा कॉल केला होता. मोदी टेल्स्ट्रा ही भारतातील पहिली मोबाईल ऑपरेटर कंपनी होती. ही कंपनी म्हणजे मोदी ग्रुप आणि ऑस्ट्रेलियातील दूरसंचार कंपनी टेल्स्ट्रा यांच्या भागिदारीतील उपक्रम होता. पहिला कॉल याच सेवेद्वारे करण्यात आला होता. मोबाईल नेट या नावानं ही सेवा ओळखली जात होती.

शुल्क आणि इंटरनेट सेवा
सुरुवातीला आऊटगोईंगसाठी 16 रुपये 40 पैसे प्रति मिनिट शुल्क आकारले जात होते. इनकमिंगलादेखील 8 रुपये 40 पैसे असा दर होता. पहिल्या 5 वर्षातच देशातील मोबाईलधारकांची संख्या 50 लाखांपर्यंत पोहोचली. विदेश संचार निगम लिमिटेडनं 1995 मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीयांना इंटरनेटची भेट दिली.

व्हीसीएनएलनं देशात गेटवे इंटरनेट ॲक्सेस सर्व्हीस सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सुरुवातीची इंटरनेट सेवा ही 4 महानगरांपुरतीच मर्यादित होती. त्यावेळी इंटरनेटसाठी 250 तासांसाठी 5 हजार रुपये शुल्क होतं. खासगी कंपन्यांसाठी हा जर 15 हजार रुपये होता.

कधी लाँच झालं 1G to 5G..?

1) 1G – 1980
2) 2G – 1990
3) 3G – 2000
4) 4G – 2010
5) 5G – 2020-2021

कोलकाता शहराला देशातील पहिली मोबाईल नेटवर्क सिटी करण्यासाठी ज्योति बसू यांनी प्रयत्न केले आणि ते यशस्वी करून दाखवले.

देशातील सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल 23 वर्षे सलग मुख्यमंत्री होण्याचा विक्रम देखील कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावावर आहे.

त्यासोबतच देशात एखाद्या राज्यात सलग 34 वर्षे सत्ता असण्याचा विक्रम पश्चिम बंगाल मध्ये माकप प्रणित डाव्या आघाडीच्या नावे आहे.

तसेच देशातील मोबाईल क्रांतीची सुरुवातच माकप नेते कॉम्रेड ज्योती बसू यांच्या नावे आहे. म्हणून…
31 जुलै हा भारतातील मोबाईल क्रांतीचा ऐतिहासिक दिवस आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*