केंद्राच्या इतर मागासवर्गीय जातींच्या (ओबीसी) यादीत समावेश होण्यासाठी प्रयत्नांचा आढावा – श्री. पी. आर. बडगुजर सर, पाचोरा

बडगुजर समाज मंडळ पाचोऱ्याचे तत्कालीन सचिव सेवानिवृत्त प्राचार्य श्री. पी. आर. बडगुजर सर यांनी सर्वात प्रथम दिनांक १६ जानेवारी २०१६ रोजी राष्ट्रीय वर्गीय आयोग ( NCBC ) नवी दिल्लीच्या कार्यालयात बडगुजर समाजास केंद्रात (OBC) सवलत मिळणे बाबत प्रस्ताव पाठविला होता. या प्रस्तावास (NCBC) नवी दिल्लीचे रिसर्च ऑफिसर्स यांनी समाजास केंद्राच्या (OBC) यादीत घेणे साठीचे व्हेरिफिकेशन पत्र मला आणि सचिव सामाजिक न्याय मंत्रालय मुंबई यांना दिनांक १८ एप्रिल २०१६ ला पाठविले होते. अशा प्रकारे सुमारे सात वर्षांपासून मी आणि माझे सहकारी बडगुजर समाज बांधव आपल्या बडगुजर समाजास केंद्रात ओबिसी सौलत मिळणेसाठी प्रयत्नशील आहोत. त्यानंतर सन २०१७ पासून २०२२ पर्यंत राष्ट्रीय ओबीसी आयोग नवी दिल्ली बरखास्त झाले होते आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगास अध्यक्ष नसल्याने इतर मागास वर्गातील जाती समूहाला आरक्षण देण्याबाबतचे निर्णय घेण्याचे कामकाज बंद होते. सन २०१७ ते २०२२ पर्यंत आम्ही केंद्रीय आयोगास वेळो-वेळी स्मरण पत्रे पाठविले आहेत. आणि दोन वेळेस आमच्या नेतृत्वात बडगुजर समाजाचे शिष्टमंडळ नवी दिल्ली येथे या कामाबाबत भेटणेसाठी गेले होते.

बडगुजर समाजाला केंद्रीय ओबीसी सवलत मिळणेसाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री यांचेकडून शिफारस पत्र मिळणेसाठी चे निवेदन देतांना श्री. पी. आर. बडगुजर, श्री. एस्. एम्. बडगुजर, श्री. नरेंद्र बडगुजर, पाचोरा विधानसभा आमदार मा. किशोर आप्पा पाटील साहेब.

दिनांक ०३/१२/२०२२ रोजी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी साहेबांनी राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाला नवी दिल्लीचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री. हंसराजजी अहिर साहेब यांची नेमणूक केली. आम्ही दिनांक. ०७/१२/२०१२ रोजी माननीय श्री. हंसराजजी अहिर साहेबांना बडगुजर समाजातर्फे आयोगाचे अध्यक्ष पद मिळाल्याबद्दल अभिनंदन पर पत्र सुद्धा आयोगाच्या कार्यालयात पाठविलेले आहे. दिनांक ०८/१२/२०२२ रोजी केंद्रीय ओबीसी महाराष्ट्र राज्याच्या यादीत बडगुजर समाजाचा समावेश होणे बाबतचा प्रस्ताव फाईल नवी दिल्ली येथे त्यांचे कार्यालयास पाठविला आहे. दिनांक ०८ जानेवारी २०२३ रोजी ‘अखिल भारतीय बडगुजर समाजाचे’ महा अधिवेशन बडगुजर समाज चामुंडा माता मिशन लोहारी बु ‌।।. ता. पाचोरा जि.जळगांव यांनी आयोजित केलेल्या महाअधिवेशनास माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई यांनी आपल्या समाजाला लोहारी येथे संबोधीत केले होते. या कार्यक्रमात चामुंडा माता मिशन लोहारी बु।।. तर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना केंद्रीय ओबीसी महाराष्ट्र राज्याच्या यादीत बडगुजर समाजाचा समावेश होणे साठी निवेदन सुद्धा आम्ही प्रत्यक्ष दिले आहे. दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी पुन्हा माननीय मुख्यमंत्री यांचे कार्यालयास वरील आशयाचा प्रस्ताव पाठविलेला आहे.

दिनांक १३/०२/२०२३ रोजी चंद्रपूर येथे माननीय अध्यक्ष राष्ट्रीय मागास वर्गीय आयोग श्री. हंसराजजी अहिर यांचे चंद्रपूर येथील कार्यालयात जाऊन चामुंडा माता मिशन लोहारी बु।।. चे समाजाचे शिष्ठमंडळ प्रत्यक्ष भेटले आम्ही माननीय हंसराजजी अहिर साहेबांना आपल्या बडगुजर समाजा बाबतची संपूर्ण माहिती दिली आणि त्यांना चामुंडा माता मिशन लोहारी तर्फे प्रत्यक्ष या बाबतची प्रस्ताव फाईल दिली तसेच माननीय हंसराजजी साहेब यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाचे २०१६ चे शिफारस पत्र दाखविले नंतर त्यांनी ते संपूर्ण वाचन केले आणि लगेच दिल्ली येथे कार्यालयीन प्रक्रियेसाठी त्यांनी त्यांच्या पी. ए. ला फोन लावून आमचे समोरच सांगितले की बडगुजर समाजाचा कार्यालयीन प्रक्रियेसाठी रिपोर्ट प्रस्ताव तयार करा त्यांना ओबीसी यादीत समावेश करायचे आहे. मी दिल्ली येथे आल्या नंतर रिपोर्ट प्रस्तावावर सही करेन. आम्ही चंद्रपूर कार्यालयात सुमारे दोन तास हजर होतो. अध्यक्षांनी आपले हे काम होणे बाबत आश्वासन दिलेले आहे.

श्री. हंसराज अहिर – केंद्रीय राष्ट्रीय पिछडा आयोग अध्यक्ष पदी निवड.झाल्याबद्दल सत्कार करतांना शिष्टमंडळ

चामुंडा माता मिशन लोहारीच्या या सामाजिक शिष्ठमंडळात सेवानिवृत्त प्राचार्य श्री पी. आर. बडगुजर पाचोरा, श्री एस. एम. बडगुजर डोंबिवली, चामुंडा माता मिशनचे फाऊंडर श्री. नरेंद्र रामदास बडगुजर लोहारी, संभाजी मधुकर बडगुजर चंद्रपूर, हिरामण भिवसन बडगुजर लोहारी हे शिष्ठमंडळ सदस्य या वेळी हजर होते (चंद्रपूरचे फोटो सोबत पाठवीत आहोत). दिनांक १३/०२/२०२३ ते दिनांक १५/०६/२०२३ पर्यंत आम्ही दहा ते पंधरा दिवसात माननीय हंसराजजी अहिर साहेबांच्या चंद्रपूर येथील पी. ए आणि नवी दिल्ली येथील दोन पी. ए यांच्याशी फोन ने संपर्कात होतो. त्यांनी बडगुजर समाजाचे ओबीसी चे काम प्रगती पथावर आहे असे सांगितले होते दिनांक १५/०६/२०२३ रोजी दिल्लीचे कार्यालयीन अधिकारी श्री. यादव साहेब यांनी फोन वर सांगितले कि तुमचे समाजाचे कामाबाबत सचिव सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई येथे आमच्या कार्यालयातर्फे व्हेरीफिकेशन साठी पत्र पाठवीत आहोत. त्या पत्राचे उत्तर आल्या नंतर तुमचे काम पूर्णत्वाला येईल, असे त्यांनी सांगितले होते. दिनांक २०/०६/२०२३ रोजी राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यांनी सचिव सामाजिक न्याय मंत्रालय मुंबई यांना पत्र पाठवून बडगुजर समाजाच्या संबंधित सर्व कागदपत्र (डाटा ) पाठवा असे त्या पत्रात नमूद केले आहे.

NCBC – श्री. हंसराज अहिर – केंद्रीय राष्ट्रीय पिछडा आयोग अध्यक्ष यांना निवेदन देतांना

दिनांक.१८/०७/२०२३ रोजी सदर पत्र सचिव इतर भागास बहुजन कलयान मंत्रालय मुंबई यांना दिनांक १९/०७/२०२३ रोजी प्राप्त झाल्याची खात्री आम्ही कार्यालयात जाऊन सततधार पाऊस असतांना सुद्धा करून घेतली आहे आणि सदर पत्राच्या मागणी कागद पत्रासह प्रस्ताव सचिवांनी दिल्ली कार्यालयाकडे लवकरात लवकर पाठवावा असा विनंती अर्ज बडगुजर समाज चामुंडा माता मिशन लोहारी तर्फे सचिवांना दिला आहे. त्या सोबत आवशकतो डाटा सुद्धा दिला आहे.

इतर मागास बहुजन कल्याण (ओबीसी) मंत्रालय मुंबई.
निवेदन


Received Copy

या शिष्ठमंडळात श्री. पी. आर बडगुजर सर, श्री एस्. एम् बडगुजर, श्री. नरेंद्र रामदास बडगुजर, श्री हिरामण भिवसन बडगुजर, श्री. अनंत रुपचंद बडगुजर लोहारी हे समाज बांधव होते. दिनांक २१/०७/२०२३ रोजी माननीय आमदार पाचोरा भडगाव श्री. किशोर आप्पा पाटील यांचे नेतृत्वात चामुंडा माता मिशन लोहारी चे शिष्ठमंडळ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन श्री एकनाथजी शिंदे साहेब यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांचे कार्यालयात शिष्ठमंडळाने भेट घेतली त्यांना आपल्या बडगुजर समाजाला केंद्रात ओबीसीत समावेश होणे बाबतचा व इतर मागण्या बाबतच्या पूर्ततेसाठीचा निवेदन अर्ज सादर केला माननीय मुख्यमंत्र्यांची हि भेट समाजाचा शिष्ठमंडळाने विधान भवनात त्यांच्या कार्यालयात मुसळधार पाऊस असताना सुद्धा भेट घेतली आहे. या शिष्ठमंडळात माननीय आमदार श्री. किशोर आप्पा पाटील, श्री नरेंद्र रामदास बडगुजर लोहारी, श्री पी. आर बडगुजर सर पाचोरा, श्री एस्. एम्. बडगुजर डोंबिवली व इतर सदस्य हजर होते.

अशा प्रकारे आम्ही समाजाच्या या महत्वाच्या कामासाठी चामुंडा माता मिशन लोहारी तर्फे सातत्याने आणि योग्य दिशेने केंद्रात बडगुजर समाजास ओबीसी यादीत समावेश होणे साठी प्रयत्नशील राहून पाठपुरावा करीत आहोत. समाजातील सर्वांच्या सहकार्याने हे काम आम्ही पूर्णत्वास नेणार आहोत आणि साधारणपणे चार ते सहा महिन्यात आपल्या समाजाला केंद्रात ओबीसी सौलत मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. या कामात कोणी दिशाहीन प्रयत्न केल्यास किंवा व्यत्येय निर्माण केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधितांवर राहील याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी हि नम्र विनंती.

श्री. पी. आर. बडगुजर,
श्री. एस्. एम्. बडगुजर,बडगुजर
श्री. नरेंद्र रामदास बडगुजर
समाज चामुंडा माता मिशन
लोहारी बु ।। ता. पाचोरा जि. जळगांव

2 Comments

  1. छान फॉलोअप घेता आहेत गरजेचे आहे तुमच्या मेहनतीला नक्की यश येईलच 👍🏻👍🏻

Leave a Reply

Your email address will not be published.


*