आज २७ जुलै:भारताचे माजी राष्ट्रपती आणि जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची आज ८वी पुण्यतिथी.
जन्म:१५ऑक्टोबर १९३१.
पूर्ण नाव:अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम
हिंदुस्थानचे मिसाईल मॅन,लोकांचे राष्ट्रपती अशी अब्दुल कलाम यांची ओळख होती,त्यांना ‘पद्म भूषण’ ‘पद्मविभूषण’ आणि ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले._
मद्रास तंत्रज्ञान संस्थेतून हवाई क्षेत्रातील एरोनॉटिकल इंजिनीयरींगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी DRDO मध्ये (संरक्षण संशोधन विकास संस्था) काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी हिंदुस्थानी लष्करासाठी हॅलिकॉप्टरचे डिझाईन तयार केले.
डॉ.कलाम यांना कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली.
सन १९६३ साली कलाम यांनी नासा या जगातील अग्रगण्य अवकाश संशोधन संस्थेला भेट दिली.त्यानंतर त्यांनी PSLV आणि SLV-3 या प्रकल्पांवर काम सुरु केले.
एकदा ४०० विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना अचानक लाईट गेली. मात्र आपल्या चर्चेत, भाषणात कुठेही बाधा न येऊ देता डॉ.कलाम संपूर्ण विद्यार्थ्यांमधून रांगेत फिरले आणि आपली चर्चा कायम ठेवली.
हिंदुस्थानचे तात्कालिक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात देशाने पोखरण येथे दुसरी अणूस्फोटाची चाचणी केली. या चाचणीत कलाम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या चाचणीनंतर देशातील आघाडीचे अणवस्त्र शास्त्रज्ञ म्हणून लोक त्यांना ओळखू लागले.
सन१९९२ ते १९९९ या कालावधीत अब्दुल कलाम देशाच्या पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार होते. पोखरण अणू चाचणीच्या वेळी राजकीय आणि तांत्रिक दोन्ही आघाडयांवर त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.
डॉ.कलाम यांचं नाव राष्ट्रपती पदासाठी निवडलं गेलं,तेव्हा शपथविधी कार्यक्रमाला त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत विमान प्रवासाचे तिकीट उपलब्ध होते,पण डॉ.कलाम हे असे व्यक्ती होते,ज्यांनी आपल्या पदाचा कोणत्याही वैयक्तिक कामासाठी वापर केला नाही.त्यांनी आपल्या नातेवाईकांना सेकंड एसी रेल्वेने दिल्लीला शपथविधीसाठी आणले.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २००२ मध्ये त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले. २६ जून रोजी त्यांनी देशाचे ११वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनातील सर्व दिवे सौरऊर्जेवर चालवण्यासाठी कलाम यांनी आराखडा तयार केला होता.पण या योजनेवर अंमलबजावणी करण्यापूर्वीच त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला.सौरऊर्जे शिवाय हिंदुस्थानने आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अणूऊर्जा आणि बायोफ्युल तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा असे त्यांचे मत होते.
‘अग्नी’ आणि ‘पृथ्वी’ या दोन क्षेपणास्त्र निर्मितीच्या तंत्रज्ञानामध्ये त्यांचे महत्वाचे योगदान होते.
एकदा एका दिक्षांत समारंभात राष्ट्रपती डॉ.कलाम यांची खूर्ची इतर खूर्च्यां पेक्षा वेगळी आणि मोठी होती.त्यामुळे त्यांनी त्या खूर्चीवर बसण्यास नकार दिला आणि साध्या खूर्चीवर बसले
डॉ.कलाम यांना कर्नाटक संगीत आणि एमएस सुब्बलक्ष्मी यांच्याबद्दल खूप आदर होता.कर्नाटक संगीत त्यांना खूप आवडायचं. सुब्बलक्ष्मी स्वत: आपल्या हातांनी जेवण बनवून डॉ. कलाम यांना वाढायच्या. त्यावेळी जेवतांना ते अगदी पारंपरिक पद्धतीनं म्हणजे खाली जमिनीवर बसून केळीच्या पानात जेवायचेत.
२७ जुलै २०१५ ला आयआयएम शिलाँग येथे विद्यार्थ्यांसमोर व्याख्यान देत असतांना कलाम यांचे निधन झाले.
डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचे १० प्रेरणादायी👇विचार.👇
१) “स्वप्न ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत.”
२) “आयुष्यात कोणत्याही कारणास्तव हार मानू नका आणि समस्या कधीही आपला पराभव करू शकत नाहीत.”
३) “या जगात एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे आहे,परंतु एखाद्याला जिंकणे तितकेच कठीण आहे.”
४) “पहिल्यांदा जिंकल्यावर आपण आराम करू नये.जर आपण दुसऱ्यांदा हरलो तर लोक म्हणतील की पहिला विजय आपल्याला मिळाला तो फुकाचा होता.”
५) “तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर आधी सूर्यासारखे जळा.”
६) “विज्ञान ही मानवतेला मिळालेली एक सुंदर देणगी आहे,ती आपण खराब करू नका.”
७) “तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे जाणून घ्या. जगातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण कुठे उभे आहोत,आपण कोणत्या दिशेने जात आहोत हे समजणं.”
८) “जेव्हा आशा, स्वप्ने आणि ध्येये तुटून पडतील, तेव्हा या निराशेच्या ढिगाऱ्यांमध्ये तुम्हाला लपलेली सुवर्ण संधी सापडेल.”
९) “देशातील सर्वोत्कृष्ट बुद्धिमान वर्गाच्या शेवटच्या बेंचवर आढळू शकते.”
१०) “जर तुम्हाला काळाच्या वाळूवर तुमच्या पावलांचे ठसे सोडायचे असतील तर पाय ओढू नका.”
भारत रत्न अब्दुल कलाम यांना ८ व्या पुण्यतिथी निमित्ताने विनम्र अभिवादन🌹
स्तोत्र:गुगल/इंटरनेट.
संकलक:प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.


Leave a Reply