🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪
🙏 आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏
गुरूवार, दि. २९/६/२०२३
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🌸🌸 पांडुरंगास…..🌸🌸
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पांडुरंगा बा रे
ऐकावे गाऱ्हाणे
सांगून सांगून
शिणलो रे….१
पांडुरंगा बा रे
उघडी तू नेत्र
थकले हे गात्र
धाव ना रे……२
पांडुरंगा बा रे
काय मी चुकलो
कशाची ही सजा
थकलो रे…….३
पांडुरंगा बा रे
माफ करी मला
पुरे झाला खेळ
आवर रे……..४
पांडुरंगा बा रे
शरण मी आलो
तूच कर्ता धर्ता
नमलो रे………५
पांडुरंग बा रे
तूच पाठीराखा
माझा प्रिय सखा
सावर रे………६
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
© स्वरचित
श्री. कैलास भाऊलाल बडगुजर, टिटवाळा
बी. एस्सी., बी. एड.
करिअर ॲडवायझर
केपी विशारद (ज्योतिष)
भ्रमण ध्वनी – 88882 84265
🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪🟪



Leave a Reply