आज २९ जून पासून चातुर्मास -भाग-३. – बडगुजर. इन

आज २९ जून पासून चातुर्मास
♥️भाग-३.♥️
देवशयनी एकादशी चातुर्मास
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥

॥ॐ नमो नारायणाय॥

देवशयनी एकादशी व चातुर्मास ( गुरुवार दि. २९ जुन २०२३ ते गुरुवार दि. २३ नोव्हेंबर २०२३ )

येत्या गुरुवार – २९ जुन २०२३ रोजी देवशयनी एकादशी आहे. हिला आषाढी एकादशी वा पद्मनाभा एकादशी असे सुद्धा संबोधतात. आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी, आपण मोठ्या एकादशी म्हणून जवळपास सर्वच जण उपवास करतो. पंढरपूरची वारी / यात्रा ह्याच दिवशी असते.
आषाढ शुद्ध एकादशी अथवा आषाढ पौर्णिमा पासून कार्तिकी एकादशी अथवा कार्तिकी पौर्णिमे पर्यंत होणाऱ्या चार मासाच्या काळास “चातुर्मास” असे म्हणतात. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस ‘देवशयनी एकादशी’ म्हटले आहे. कारण त्या दिवशी श्री विष्णू भगवान योगनिद्रेत जातात, अशी समजूत आहे.
कार्तिकी एकादशीस श्री विष्णू भगवान योगनिद्रेतून उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी’ (बोधिनी देवोत्थानी) एकादशी असे म्हणतात. वस्तुतः दक्षिणायन हे सहा मासांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण प्रबोधिनी एकादशी पर्यंत ४ मास पुरे होतात. याचा अर्थ असा की, एक तृतियांश रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात. नवसृष्टिनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्री विष्णू निष्क्रिय असतो, म्हणून चातुर्मासास विष्णूशयन म्हटले जाते. ह्या काळात सृष्टीचे संचालन श्री महादेव करतात. दुसऱ्या एका मान्यतेनुसार श्री.विष्णू भगवान हे चतुर्मासात पाताळात बळीराजा कडे असतात. म्हणून चातुर्मासास कुठलेही शुभ कार्य करत नाहीत.

एकादशी प्रारंभगुरुवार
२९/०६/२३ पहाटे ३.२० मि.
एकादशी समाप्ती – शुक्रवार ३०/०६/२३ पहाटे २.४२ मि.
पारणे वेळ – शुक्रवार ३०/०६/२३ सकाळी ८.५० ते १०.२५ मि.

श्री विष्णूंच्या ह्या निद्राकाळात असूर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असूरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे. आपण सर्व ह्या देवशयनी एकादशी पासून ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत जास्तीत जास्त श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करण्याचे व्रत करू या. ४ च्या पटीत रोज आवर्तने करुन कार्तिकी एकादशी पर्यंत जास्तीत जास्त श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण करावे आणि एकूण (चातुर्मासातील) आवर्तने नेहमीप्रमाणे आपल्या वैयक्तिक आवर्तन संख्येत जोडून साईटवर नोंदवावीत व जे भक्त गीता फाउंडेशनचे सदस्य नाहीत त्यांनी सदस्यत्व नंबर घ्यावा. अन्यथा खालीलपैकी कोणाही एका प्रतिनिधीला फक्त एकदाच आपली आवर्तन संख्या कळवावी.

🔹श्री श्रीपाद गलगले –
9225101823
🔹श्री रमेश बापट –
9823105699
🔹श्री अरुण अडावदकर –
9823087517
🔹श्री अनिल सुकेणकर –
9158885667

देवशयनी एकादशी कथा

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे आषाढी एकादशी साजरी करण्यात येते. काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे. श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिक एकादशी प्रबोधिनी नावाने ओळखली जाते.

lॐ कृष्णं वंदे जगद्गुरूम् l
🔹🔷🔹◼️▪️◼️▪️🔹🔷🔹▪️◼️▪️◼️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*