आज १७ जून संत निवृत्तीनाथ यांची पुण्यतिथी
🚩👇🚩
महती:संत महंतांची
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू.नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
संत निवृत्तीनाथ जन्म:
निवृत्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ किंवा १२६८ असे
सांगितले जाते.ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई,निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते.निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला.त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
गैनीनाथ व गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. निवृत्तिचे ध्येय कृष्ण हाचि होय l
गयिनीनाथे सोय दाखविलीll असे निवृत्तिनाथांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे असे म्हणता येईल.. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे हे अभंग आहेत. रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथापि निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक म्हणून आहे.
ग्रंथ: त्यांनी ‘आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले’ असे निवृत्तिनाथांबद्दल म्हटले जाते. ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वरांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही निवृत्तिनाथ त्यांच्या सोबत होतेच. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा.म.आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ निवृत्तिनाथांचाच आहे,असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळे श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेविली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर मुक्ताई ‘अन्नपाणी सकळ’ त्यागूनी परलोकवासी झाली, व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरी देह ठेविला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. निवृत्तिनाथांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते.
निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे. निवृत्तिदेवी,निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. धुळे श्रीसमर्थवाग्देवता मंदिरात “सटीक भगवद्गीता” आणि “समाधि बोध” अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली.
संत निवृत्तीनाथ जीवन:
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सदगुरू रहात होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले.
पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले.
त्यावेळेस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला.त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले.ते अरण्यातून बाहेर पडले, तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला; पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात! पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाहीत. असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला. ते अधिक तेजस्वी दिसत होते. विठ्ठलपंतांनी विचारले,
”अरे इतके दिवस तू कुठे होतास ?” निवृत्तीनाथ म्हणाले, ”बाबा, वाघाला भिऊन पळतांना मी एका गुहेत शिरलो.
त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ.
त्यांनी मला योग शिकवला आणि ‘आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर’, असे सांगितले.”
नंतर मुलांची मुंजीची वेळ आली. मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले;
पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले,
”तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे.
तुम्हाला देहान्त प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही.
ते तुम्ही घ्याल, तरच मुलांच्या मुंजी होतील.”
हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले.
मुले गाढ झोपेत आहेत, हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला.
ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई-वडील घर सोडून गेल्याचे कळले.
त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले.
सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला होता.
निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला
निवृत्तीनाथ महाराज समाधी: मुक्ताई,आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी
शके १२१८ मधील ज्येष्ठ कृ.त्रयोदशी या दिवशी १७ जून १२९७ रोजी त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली.
समाधीवर इ.स. १८१२ मध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले.
मूळ मंदिरातील निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
संत निवृत्तीनाथांचे अभंग.
🔱🚩🙏🚩🔱
हरिविण दैवत नाहीं पैं
हरिविण चित्तीं न धरीं
हरिमार्ग सार यॆणॆंचि
ऎकॆविण दुजॆं नाहीं
जपतां कुंटिणी उतरॆ
ऎक तत्त्व हरि असॆ
गगनींचा घन जातॊ
सृष्टीच्या संमता सुरतरु
सर्वांभूतीं दया शांती
जयाचॆनि सुखॆं चळत
हरीविण भावॊ वायांचि
ध्यान धरा हरी विश्रांति
प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया
लटिका संसार वाढविसी
कल्पना काजळी कल्पिलॆ
मॊहाचॆनि दॆठॆं मॊहपाश
तिमिरपडळॆं प्रपंच हा
प्रवृत्ति निवृत्ति या दॊन्ही
क्षॆत्राचा विस्तार क्षॆत्रज्ञवृत्ति
आम्ही चकॊर हरि चंद्रमा
ज्याचॆ मुखीं नाम
नित्य नाम वाचॆ तॊचि
अखंड जपतां रामनाम
नाम नाहीं वाचॆ तॊ नर
नामाचॆनि बळॆं तारिजॆ
अवीट अमोला घेता पैं
प्राणिया उद्धार सर्व हा
रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष
पाहतां साधन विठ्ठलकीर्तन
मन कामना हरि
पुंडलीकपेठ वैष्णवाचा
विठ्ठल श्रीहरि उभा
भवजळ काया पंचतत्त्वमाया
नित्य हरिकथा नित्य
प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत
सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण
उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें
पंढरीये चोख रूपडें अशेख
पिंड हा न धरी ब्रह्मार्पण
हरिविण व्यर्थ आचार
भाग्याचेनि भाग्य उदो पैं
ध्येय ध्यान मनीं उन्मनीं
काळवेष दुरी काळचक्र
नाहीं यासि गोत नाही
गोपाळ संवगडे आले
आनंद सर्वांचा काला
तंव आनंदला हरि परिपूर्ण
नघडुनिया दृष्टि नामा
नुघडितां दृष्टि न बोले
सत्यभामा माये अन्नपूर्णा
काला तंव निकटी श्रीरंग
वैष्णवांचा मेळा सकळ
पांडुरंग हरि माजी
आपुलेनि हातें कवळु
उपजे तें मरे मरे तें
धीराचे पैं धीर उदार ते
विश्रामधर्मता आश्रमपूर्णता
अकर्ता पैं कर्ता नाही
सारासार धीर निर्गुण
स्थिर धीर निर सविचारसार
नीट पाठ आम्हां धीट
पियूषी पुरतें कासवी
निर्दोषरहित सर्व गुणीं
निराकार वस्तु आकारासि
परेसि परता पश्यंति
रूप नाम अरूप रूपाचें
वर्ण व्यक्ति सरवे
मंगल मांगल्य ब्रह्म हें
ज्ञानेंसे विज्ञानी उन्मनि
ग्रासूनी भान मान दृश्य
गगनवाड दृष्टी सर्व
नेणती महिमा ब्रह्मादिक
सिद्धीचे साधन नेणती
नसे तो ब्रह्मांडी नसे
खुंटले वेदांत हरपले
तेथें नाहीं मोल मायाचि
नाहीं छाया माया
प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा नेम
ज्ञानेंसि विज्ञास रूपेंसि
आदिरूप समूळ प्रकृति
वैकुंठ कैलास त्यामाजी
निरशून्य गगनीं अर्क
निरालंब सार निर्गुण
ज्या नामें अनंत न
विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें
निराकृती धीर नैराश्य
आदि मध्ये वावो अवसान
जेथें रूप रेखा ना
मध्यबिंदनाद उन्मनि
विश्वातें ठेऊनि आपण
विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक
त्रिभंगी त्रिभंग जया
ज्याचे स्मरणें कैवल्य
विकट विकास विनट
गगनाचिये खोपे कडवसा
गगनीं उन्मनी वेदासी
गनीं वोळलें येतें तें
क्षीराचा क्षीराब्धि क्षरोनियां
निरशून्य गगनीं अंकुरलें
निरोपम गगनीं विस्तारलें
निराळ निरसी जीवशीवरसीं
निरासि निर्गुण नुमटे
निरालंब देव निराकार
दुजेपणा मिठी आपणचि
अरूप बागडे निर्गुण
मेघ अमृताचा जेथूनि
वैभव विलास नेणोनिया
ब्रह्मांड करी हरि ब्रह्म
आदीची अनादि मूळ पैं
बिंबीं बिंबीं येक बिंबलें
वैकुंठ दुभतें नंदाघरीं
गोकुळीं वैकुंठ वसे
सर्वस्वरूप नाम राम
हें व्यापूनि निराळा
न साहे दुजेपण आपण
नाहीं हा आकार नाहीं
जेथुनि उद्गारु प्रसवे ॐ
योगियांचे धन तें ब्रह्म
देवामुकुटमणि ऐकिजे
वेदबीज साचें संमत
ब्रह्मादिक पूजा इच्छिती
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे
निरालंब बीज प्रगटे
वैकुंठदेवत देवामुगुटमणी
गगन घोटींत उठि पृथ्वी
गगनींचा गगनीं तेज
निरपेक्षता मन अनाक्षर
अद्वैत अमरकंदु हा
जयामाजी दीक्षा हारपोनि
रसज्ञ रसाचार रसामाजी
अनंत रचना हारपती
व्याप्तरूपें थोर व्यापक
गगन घांस घोंटी सर्व
कारण परिसणा कामधाम
जेथें रूप रेखा नाहीं
गोत वित्त चित्त गोतासी
विश्वाचा चाळक सूत्रधारी
जाणोंनि नेणते नेणत्या
मृगजळाभास लहरी अपार
गोत वित्त धन मनाचें
निराकृत्य कृत्य विश्वातें
मथनीं मथन मधुरता
मन निवटलें ज्ञान सांडवलें
अव्यक्त आकार अकारलें
निरशून्य बिंबी आकार
पंचतत्त्व कळा सोविळी
हिरण्यगर्भ माया अंडाकार
पंचतत्त्व कळा सोविळी
नित्य निर्गुण सदा असणें
नामरूपा गोडी ब्रह्मांडा
खुंटले साधन तुटलें
निकट वेल्हाळ नेणों
रूप हें सावंळे भोगिताती
भरतें ना रितें आपण
न देखों सादृश्य हारपे
नाहीं त्या आचारु सोंविळा
अजन्मा जन्मला अहंकार
परेसि परता न कळे पैं
ज्या रूपा कारणें
न साहात दुजेपण
सूर्यातें निवटी चंद्रातें
न साधे योगी न
भावयुक्त भजतां हरी
जेथुनीया परापश्यंती
उफराटी माळ उफराटें
श्यामाचि श्यामशेज वरी
विस्तार विश्वाचा विवेकें
तारक प्रसिद्ध तीर्थ तें
आगम निगमा बोलतां
अष्टांग सांधनें साधिती
अंधारिये रातीं उगवे
दुभिले द्विजकुळी आलें
विश्वीं विश्वपती असे
जेथें नाहीं वेदु नाहीं पै
हा पुरुष कीं नारी नव्हे
ध्यानाची धारणा उन्मनीचे
चतुरानन घन अनंत
ज्या रूपाकारणें देव
गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड
चिंतितां साधक मनासि
निज लक्षाचें लक्ष हरपलें
अनंतरूप देव अनंत
जेथें न रिघे ठाव
मी पणे सगळा वेदु
हरिदास संगे हरिदास
सोपान संवगडा स्वानंद
वोळलें दुभतें सर्वांसि
धन्य हा खेचर धन्य
कमळाच्या स्कंधी गुणी
गयनी गव्हार कृपेचा
शांति क्षमा दया सर्वभावें
प्रकृतीचा पैठा कल्पना
कांसवीचीं पिलीं करुणा
आदिनाथ उमाबीज
चेतवि चेतवि सावधान
हरि आत्मा होय परात्पर
सुमनाची लता वृक्षीं
छेदियेला वृक्ष तुटलें
परम समाधान परमवर्धन
विस्तार हरिचा चराचर
तुटलें पडळ भेटलें केवळ
मारुनि कल्पना निवडिलें
आमचा साचार आमचा
नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं
सर्वांघटी वसे तो आम्हां
माता पिता नाहीं बंधु
पूर्णबोधें धाले आत्मराम धाले
आम्हां जप नाम गुरुखूण
नव्हें तें पोसणें नव्हे तें
चराचरीं हरि गुरुमुखें
साकार निराकार ब्रह्मीचे विकार
प्राकृत संस्कृत एकचि
सार निःसार निवडूनि टाकीन
पृथ्वी श्रीराम आकाश हें
हरिविण न दिसे जनवन
नामरूप सोय नाहीं
स्वरूप साजणी निद्रिस्त
मनाची वासना मनेंचि
एक देव आहे हा भाव
दिननिशीं नाहीं अवघा
द्वैताचीये प्रभे नसोन
निजतेज बीज नाठवे हा
श्यामाची श्याम सेजवरी
नेणो पैं द्वैत अवघेंचि
म्हणवितो नंदाचा बाळ
अनंत ब्रह्मांडें अनंत
सप्त पाताळें एकवीस
कल्पितें कल्पिलें चित्त
बुद्धि बोध नाहीं क्षमारूप
व्योमामाजि तारा असंख्य
खुंटलें तें मन तोडियेली
सौजन्य समाधान सर्व
मातेचें बाळक पित्याचें
विश्रामीचा श्रम आश्रम
तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित
चातकाचें ध्यान मेघाचें जीवन
साधक बाधक न बाधी
त्रैलोक्य पावन जनीं
प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ
कल्पना कोंडूनि मन
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩



Leave a Reply