आज १८ जून – आंतरराष्ट्रीय सहल दिवस – बडगुजर. इन

आज १८ जून – आंतरराष्ट्रीय सहल दिवस
सहल म्हटले की पहिले आपल्याला आपले शाळेचे दिवस आठवतात कारण लहान असताना नेहमी आपल्या शाळेची कुठेतरी ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळी सहल जायची.त्यामुळे सहल ही आपणास लहानपणापासुनच माहीत आहे.
आपल्या कुटूंबासोबत वेळ व्यतित करण्याचे हे एक उत्तम साधन तसेच माध्यम बनले आहे.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहल दिवस साजरा करण्याचे मुख्य उददिष्ट म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन वेळ काढुन आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या फँमिलीसोबत एक चांगला वेळ व्यतीत करायला हवा त्यांच्यासोबत बाहेर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जायला हवे,त्यांना आपण आपल्या कामातुन सवड काढुन वेळ द्यावा त्यांच्याशी संवाद साधावा हे सांगण्यासाठी, आपणास आपल्या जीवणातील सहलीचे महत्व पटवुन देण्याकरीता हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो.
आंतरराष्ट्रीय सहल दिनाच्या दिवशी सर्व फँमिली मित्र मैत्रीणी जमतात आणि निसर्गाच्या सान्निध्यात किंवा एखाद्या आपल्या आवडत्या पर्यटन ठिकाणी जातात तिथे पर्यटनाचा आनंद घेतात.तंबु गाडुन तिथे पिकनिक साजरा करतात,याच दिवशी लहान मुले गार्डनमध्ये जाऊन खेळतात स्विमिंग पुलमध्ये स्वीमिंग करतात,खुप खेळता बागडता गप्पा गोष्टी करतात.बाहेरगावी एखाद्या पाहण्या जोग्या स्थळी ट्रिपला जातात.तर मोठी माणसे याचदिवशी एखाद्या धार्मिक देव स्थळाला भेट देतात.
शाळेत देखील हा दिवस एखाद्या सुटटीप्रमाणे साजरा केला जातो.या दिवशी सर्व शिक्षक आपल्या विदयार्थ्यांना घेऊन एखाद्या बगीचात जातात.किंवा एखाद्या समुद्रठिकाणी,निसर्ग सौदर्य असलेल्या किंवा ऐतिहासिक स्थळी जातात.
°°° प्रा.सी.डी.साळुंखे,धुळे.
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*