⛳श्री दुर्गादेवीची आरती⛳ – बडगुजर. इन

⛳श्री दुर्गादेवीची आरती⛳

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीl_
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीll
वारी वारी जन्ममरणाते वारी ।
हारी पडलो आता संकट निवारीll

जय देवी जय देवी महिषासुरमथनीl
सुरवरईश्वर-वरदे तारक संजीवनीll
“जय देवी जय देवी”

त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही।
चारी श्रमले परंतु न बोलवे काहीll
साही विवाद करिता पडले प्रवाही।
ते तू भक्तालागी पावसी लवलाहीll

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासांl_
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशाll
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशाl
नरहरि तल्लीन झाला पदपंकजलेशाll

अर्थ: श्री दुर्गादेवीच्या आरतीमधील काही कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊया.शब्दार्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते.
१.)‘वारी वारी जन्ममरणाते वारी’ यामधील ‘वारी’ या शब्दाचा अर्थ आहे ‘सोडव’
२.)‘चारी श्रमले परंतु न बोलवे काही।साही विवाद करिता पडले प्रवाही।या ओळीचा अर्थ आहे की, देवीच्या स्वरूपाचे वर्णन करतांना चारही वेद थकले आणि सहा दर्शनेसुद्धा या विवादाच्या प्रवाहात वाहून गेली, म्हणजे त्यांनाही वर्णन करणे शक्य झाले नाही.
अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो,अशी देवीच्या चरणी रस प्रार्थना आहे.
⛳〰️〰️〰️⛳〰️〰️〰️⛳〰️〰️〰️⛳〰️〰️〰️⛳〰️〰️〰️⛳〰️〰️〰️•

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*