जगातील सर्वात लहान देश ! – संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

═━═━═━═━═━═━═━═━═━═━═
🎯 जगातील सर्वात लहान देश !
🎯 जिथे राहतात फक्त २७ लोक !
═━═━═━═━═━═━═━═━═━═━═

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

जगातील सर्वात जास्त लोकसंख्या आणि क्षेत्रफळ असलेल्या देशांची नेहमीच चर्चा होत असते. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या देशा मध्ये नेहमीच चढाओढ होत असते. पण असा एक देश आहे जिथे फक्त २७ लोक राहतात. हा देश जगातील सर्वात लहान देश आहे. हे जगातील सर्वात लहान देशाचं नाव सीलँड आहे, जे इंग्लंड जवळ आहे. हा देश इंग्लंडच्या सफोक बीच पासून १० किमी अंतरावर आहे.

सीलँड हा देश एका किल्ल्यावर वसलेला आहे. दुसऱ्या महायुद्धात हा किल्ला ब्रिटिशांनी बांधला होता. नंतर त्यांनी हा किल्ला रिकामा केला. तेव्हा पासून सीलँडवर वेगवेगळ्या लोकांनी कब्जा केला आहे. या देशाला माइक्रो नेशन म्हणतात. सुमारे १३ वर्षा पूर्वी ९ ऑक्टोबर २०१२ रोजी, रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वत:ला सीलँडचा राजकुमार घोषित केले. बेट्सच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा मायकेल याने राज्य केले. या लहान देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. तो कोणत्याही देशाचा भाग नाही.

सीलँडचे एकूण क्षेत्रफळ २५० मीटर (०.२५ किमी) आहे. पण जीर्ण अवस्थेत पोहोचलेल्या या किल्ल्याला सीलँड व्यतिरिक्त रफ फोर्ट असेही म्हणतात. आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नसतानाही सीलँडचे स्वतःचे चलन आणि मुद्रांक आहे. सीलँडचे क्षेत्रफळ फारच कमी असल्याने तेथे उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा लोकांना या देशाची माहिती झाली तेव्हा इथल्या लोकांच्या मदतीसाठी लोक पुढे आले. त्यांनी भरपूर दान दिले. त्यामुळे येथील जनतेला आर्थिक मदत मिळाली. यानंतर येथील लोकांचा उदरनिर्वाह सुरू झाला. आता लोक इथे फिरायला जातात, त्यामुळे इथे लोक कमाई करू लागले आहेत. या माइक्रो नेशनचे स्वतःचे हेलिपॅड देखील आहे. सीलँड हा अनोळखी देशा पैकी सर्वात लहान देश मानला जाऊ शकतो, परंतु व्हॅटिकन सिटी हा जगातील सर्वात लहान देश आहे. युरोपियन कंट्री वर्टिकल सिटी हे इटलीची राजधानी रोमच्या मध्यभागी स्थित आहे, ज्याचे क्षेत्रफळ ०.४४ चौरस किमी म्हणजेच अर्ध्या किलोमीटर पेक्षा कमी आहे.

सौजन्य : News 18 लोकमत

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*