प्रणय गिरीश बडगुजर- विंडसर विद्यापीठ,कॅनडा येथून सिव्हिल इंजिनियरिंग क्षेत्रात एम्.एस्. – श्री. विजय बडगुजर,पुणे.

👉शैक्षणिक वार्ता👈

बडोदा: येथील श्री.गिरीश वसंतराव बडगुजर यांचा मुलगा तथा अमळनेर निवासी श्री.वसंतराव मोतीरामशेठ बडगुजर,यांचा नातू प्रणय हा सिव्हिल इंजिनियरिंग क्षेत्रात पदवी प्राप्तीनंतर, जगप्रसिध्द विंडसर विद्यापीठ,कॅनडात उच्च शिक्षणासाठी दाखल होऊन मास्टर ऑफ सायन्स [MS in Civil Engineering]पदवी अभ्यासक्रमात घवघवीत यश प्राप्त करत सातासमुद्रापार बडगुजर नावाचा झेंडा रोवला.
प्रणय लहानपणापासूनच हुशार व घरात सर्वांचा लाडका होता.प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लिलया पूर्ण करत १०वी व १२ वीत घवघवीत यश संपादन केलेनंतर सिव्हिल इंजिनियरिंग क्षेत्रात पदवीधर झालेला मुलगा,कॅनडा सारख्या प्रगत देशात जाऊन शैक्षणिक पदवी ग्रहण करत आईवडीलांचे तथा बडगुजर समाजाचा नावलौकीक वाढविलेबद्दल प्रणयचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती,अ.भा. बडगुजर समाज युवा व शिक्षण समिती,समस्त बडगुजर समाज,बडोदा (गुजरात),बडगुजर.इन, बडगुजर प्राउड फाउंडेशन टीम-बडोदा निवासी श्री. गिरीशकुमार बडगुजर परिवाराच्या आनंदात सहभागी होत प्रणय चे अभिनंदन व कौतुक करत आहोत.
“प्रणय आगे बढो इंजिनियरिंग की उंची से उंची स्टेप चढो!”
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*