आज १ जून, म्हणजे महाराष्ट्रीय /सरकारी वाढदिवस – बडगुजर. इन

आज १ जून, म्हणजे महाराष्ट्रीय /सरकारी वाढदिवस.
पु.ल.नेहमी म्हणायचे,
जवळजवळ निम्मा महाराष्ट्र जून मध्येच जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे.

💐💐💐💐💐💐💐
कष्ट करत करत जीवन जगणाऱ्या,अल्प शिक्षण असलेल्या, संस्काराने परीपूर्ण,कर्तव्याची जाणीव, कुटुंब व्यवस्थेचा सन्मान, कुटुंब नियोजन……आदर्श शेजारधर्म,माणुसकी जीवंत, डोक्यावर पाणी पुरवठा शेणसडा रांगोळी,न्याहारी, चुलमुल,सासुरवास,ह्या सर्व कटकटीमधून वेळ मिळाल्यावर मुलाला/मुलीला गावातील मराठी शाळेत हात धरून पायी चालत घेऊन जाऊन शाळेच्या मास्तर (गुरूजी) समोर उभे केल्यानंतर मग कुठे मास्तरांनी आपला जन्म (१ – जून) ह्याच दिवशी झाला याच्यावर शिक्कामोर्तब करून शाळेत प्रवेश मिळे.मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी वय वर्ष ६ पूर्ण असावे लागत असे,त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरवून जन्म तारीख अशी टाकायची की त्याला जून मध्ये ६ वर्ष पूर्ण होतील.आज भारतातील सर्वात मोठा सर्वात जास्त वाढदिवस असणारा दिवस आहे.१ जून आज रोजी शिक्षकांच्या लेखणी मुळे कागदोपत्री वाढदिवस संख्याचे प्रमाण प्रचंडच.गुरूजनांच्या कृपेने शाळेत दाखल करतात तोच दिवस जन्म दिनांक टाकून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचा शिक्षणाचा महायज्ञ सुरू.
१९७५ च्या आधी निरक्षरता जास्त होती. त्यावेळी बहुतांश पालकांना आपल्या पाल्याची जन्मतारीख माहीत नसायची. मात्र साल माहित असायचे. गुरुजींनी शाळा प्रवेशाच्या वेळी संबंधित पालकांना पाल्याची जन्मतारीख विचारल्यावर मात्र हे पालक गोंधळायचे,निदान वर्ष माहित आहे का असे विचारल्यावर पालक वर्ष सांगत असत. मग त्याच वेळी गुरुजी आपल्या सोयीनुसार १ जून ही जन्म तारीख निश्चित करायचेत.अशा पद्धतीने अनेकांच्या जन्मतारखांचा जन्म झालेला आहे.१९७५ नंतर मात्र साक्षरता वाढत गेली आणि पालक जागरूक झाल्याने पाल्याची जन्मतारीख लिहून ठेवू लागलेत.
अशा पद्धतीने आज ज्या कोणाचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!!आपल्या ग्रुप मधील सर्व शिक्षक बंधू भगिनी व निसर्ग या दोघांचा ताळमेळ राखत आज रोजी या भूतलावर स्वत:ची ओळख घेऊन आलेत,व त्यांनी-आपल्याला सुद्धा त्यांच्या कार्यातून, ओळख प्राप्त करून दिली..त्या सर्वांना…
वाढदिवसाच्या🫶हार्दिक शुभेच्छा🌹.
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभो ही मंगलमय कामना!*

🫶🫶🫶🫶🫶🫶🫶

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*