आज 1 जून…
आज जागतिक पालक दिन…
आज 1 जून रोजी जागतिक पालक दिन जगभर साजरा केला जात आहे. हा दिवस पालकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पालकांचे आभार मानण्यास विसरू नका.
1 September सप्टेंबर 2012 रोजी, संयुक्त राष्ट्राने पालकांच्या जागतिक दिनानिमित्त एक ठराव संमत केला आणि पालकांच्या सन्मानार्थ दरवर्षी हा उत्सव साजरा करण्याची घोषणा केली.
जून महिन्याची सुरूवात ही Global Day Of Parents ने होते. या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील पालकांनी त्यांच्या मुलांसाठी, पाल्यांसाठी केलेल्या त्यागाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या नात्याला दृढ करण्याची एक संधी असते.
जगभरातील पालकांची वचनबद्धता आणि निःस्वार्थ प्रेम यांना साजरं करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) हा दिवस घोषित केला आहे.
तुम्ही पालकांना आजच्या पॅरेंट्स डे च्या निमित्ताने शुभेच्छा देऊ शकता. प्रत्येक घराचा कणा हा त्यांचं कुटुंब असतं. अनेक आपण जवळच्या व्यक्तींना गृहीत धरतो पण त्यांची खरी किंमत ही कठीण काळातच समजते. म्हणूनच ती वेळ येईपर्यंत थांबू नका. आई-वडीलांसह तुमचं कुटुंब आजच्या दिवशी एकसंध ठेवण्यसाठी प्रयत्न करा आणि वेळोवेळी त्यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करा.
आई – वडीलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताचं मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही…
वडिलांपेक्षा चांगला सल्लागार कोणीही नाही…
आई पेक्षा मोठं जग कोणतचं नाही..
मनातलं जाणणारी आई
भविष्य ओळखणारा बाप
अजून काय हवं जीवनात
वेळ बदलते, काळ बदलतो
परिस्थिती बदलते, माणसं बदलतात
पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही
कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.
आई-वडीलांचा हात धरुन ठेवा.
कधीच लोकांचे पाय पडण्याची वेळ येणार नाही.


Leave a Reply