||श्री कुलस्वामिनी चांमुडा माता ||
पारोळा येथील बालाजी विद्या संस्थेच्या संचालक व श्री. उमेश आप्पा करोडपती यांच्या पत्नी सौ. मंगला उमेश करोडपती यांना नुकताच शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक या संस्थे तर्फे कोरोना योध्दा व यशस्वी कारकीर्दीची प्रेरणास्रोत म्हणून दि.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘ कांताई नाट्यगृह बस स्टँड जवळ, जिल्हा पेठ जळगांव येथे सन्मानित करण्यात येणार आहे.
शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुउद्देशीय संस्था, नाशिक यांच्या मार्फत राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२० चे आयोजन करण्यात आले होते. यात आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची या सन्मानासाठी व पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
आपणांस पुढील वाटचालीस अखिल भारतीय युवक समिती, प्राऊड ग्रुप, बडगुजर. इन,बडगुजर युवा संगठन सुरत, व 👣जय चांमुडा माता हिरकणी ग्रुप👣 कडून हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
Leave a Reply