बडगुजर समाजाच्या शिरपेचात मानाचा तुरा श्री. प्रमोद विश्वनाथ बडगुजर यांची भारतीय वायुदलाच्या वायुसैनिक विभागातील सर्वोच्च पदावर पदोन्नती

शेंदुर्णी हल्ली मुक्काम जळगाव येथील कै. विश्वनाथ दौलत बडगुजर यांचे ज्येष्ठ सुपुत्र तसेच जळगांव येथील पोलिस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी राष्ट्रपती पदक विजेते श्री. प्रदीप बडगुजर व श्री. दिनेश बडगुजर यांचे मोठे बंधू श्री. प्रमोद विश्वनाथ बडगुजर यांची भारतीय वायू दलात वायुसैनिक विभागातील सर्वोच्च पदावर स्वातंत्र्यदिनी बढती करण्यात आली.

पदोन्नती मिळाल्यानंतर परिवारात सोबत फोटो

श्री. प्रमोद विश्वनाथ बडगुजर हे जळगाव येथील रहिवासी असून आधीपासूनच वडिलांच्या छत्रछायेत आणि प्रेरणेने पोलीस दला विषयी विशेष प्रेम व आशा बाळगून आपले बालपणीच देशसेवा करायची प्रबळ इच्छाशक्ती मनी बाळगून होते. श्री प्रमोद बडगुजर यांनी दहावीचे शिक्षण पिंपळगाव हरेश्वर येथून पूर्ण केले आणि बारावी ही जळगाव येथील नूतन मराठा विद्यालय या ठिकाणाहून पुर्ण केले.

त्यानंतर भारतीय वायुदलामध्ये प्रवेश परीक्षा आणि स्क्रीन टेस्ट द्वारे त्यांची सप्टेंबर 1983 मध्ये वायुदलात निवड झाली. टेक्निकल ट्रेड (रडार) या पदावर त्यांनी भारतीय वायुदलात काम पाहिले. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांची पोस्टिंग झाली तसेच त्यांनी ग्राउंड रडार, एअर रडार अशा विविध टेक्निकल, मिराज सिमुलेटर विभागांमध्ये सुद्धा त्यांनी काम पाहिलेले आहे. तसेच भारताकडून विशेष आणि महत्वपूर्ण मिशन साठी श्रीलंकेत १३ महिने भारतीय वायुदलाकडून प्रमुख अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळातील एक प्रमुख सदस्य म्हणून त्यांनी त्यावेळी सुरू असलेल्या LTTE & Shrilanka यांच्या युध्दजन्य परीस्थितीत भारतासाठी हे कार्य यशस्वीपणे पाहिले.

विविध कामगिरी बजावितांना

तसेच त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये फील्ड एरिया मध्ये मायनस डिग्री तापमान असलेल्या ठिकाणी दोन वर्ष काम केले. आपल्या या भारतीय हवाई दलाच्या सेवेत त्यांनी अशा विविध जोखमीच्या ठिकाणी अगदी चोखपणे व कर्तव्यदक्षतेने आपले काम पाहिले. आणि आपल्या या कार्यकुशलतेमुळे त्यांना एअर चिफ मार्शल यांच्याकडून कमेंडेशन आणि सत्कार ही बऱ्याचदा करण्यात आला.

या स्वातंत्र्य दिनी 15 ऑगस्ट 2021 रोजी आपल्या सेवेचे ३८ वर्षे पुर्ण केलेत आणि या प्रदीर्घ सेवेच्या व प्रभावी कार्यकुशलते मुळे त्यांना भारतीय वायुदला मधील वायुसैनिक विभागातील सर्वोच्च पद – Honorary Flight Lieutenant यापदावर पदोन्नती झाली.

पारिवारिक फोटो

श्री. प्रमोद बडगुजर सध्या पुणे येथील पिंपळे सौदागर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा कौस्तुभ बडगुजर हा अमेरिकेतील टेक्सास येथे आयटी इंजिनिअर आहे व मुलगी कु. कल्याणी बडगुजर ही सुद्धा आयटी इंजिनिअर असून पुणे येथे नामांकित कंपनीत टीम लीडर म्हणून कार्य करत आहेत. तसेच श्री. प्रमोद यांना दोन लहान भाऊ श्री. प्रदीप व श्री. दिनेश हे आहेत व दोघेही जळगांव येथे पोलीस दलात कार्यरत आहेत. श्री. प्रदीप बडगुजर हे राष्ट्रपती पदक विजेते आहेत व सर्वात लहान बंधू श्री. दिनेश बडगुजर हे जळगांव पोलीस दलातील प्रभावशाली अधिकारी आहेत. अतिशय सुखी व उच्चशिक्षित असा परिवार आहे.

श्री. दिनेश, श्री. प्रमोद व श्री. प्रदीप बडगुजर तिघे बंधु

त्यांना पदोन्नती मिळाल्यामुळे परिवार, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या मध्ये अभिमानाची आणि गौरवास्पद वातावरण आहे. त्यांना मिळालेली पदोन्नती ही समाजभूषणावह आहे. बडगुजर समाजातील प्रथम व्यक्ती आहे की ज्यांना हा सर्वोच्च बहुमान मिळालेला आहे आणि अशा या कर्तव्यदक्ष देश प्रेमी व्यक्तीमत्व श्री. प्रमोद विश्वनाथ बडगुजर यांस बडगुजर. इन, युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपचा सलाम व भावी वाटचालीस शुभेच्छा.

श्री. प्रमोद विश्वनाथ बडगुजर

14 Comments

  1. Congratulations to Shri.Pramod Badgujar, Proud of you💐💐🎉🎉👌👍

    • श्री.प्रमोदजी विश्वनाथ शेठ बडगुजर (भारतीय हवाई दल) ,
      ” राम राम ,
      * आपण भारतीय हवाई दलात प्रदिर्घ देश सेवा बजावित
      आहात ! आपल्याला ७५ वाढ स्वातंत्र दिनाच्या
      मुहुर्तावर पदद्दोन्नती मिळाली !आनंद वाटला !

      * आपले हार्दिक अभिनंदन !

      * शुभेच्छुक *
      * ब.स.उ‌ .मंडळ,मुंबई / बडगुजर दर्शन /
      * बडगुजर समाज महिला मंडळ ,मुंबई

  2. श्री.प्रमोदजी विश्वनाथ शेठ बडगुजर (भारतीय हवाई दल) ,
    ” राम राम ,
    * आपण भारतीय हवाई दलात प्रदिर्घ देश सेवा बजावित
    आहात ! आपल्याला ७५ वाढ स्वातंत्र दिनाच्या
    मुहुर्तावर पदद्दोन्नती मिळाली !आनंद वाटला !

    * आपले हार्दिक अभिनंदन !

    * शुभेच्छुक *
    * ब.स.उ‌ .मंडळ,मुंबई / बडगुजर दर्शन /
    * बडगुजर समाज महिला मंडळ ,मुंबई

  3. प्रमोद विश्वनाथ बडगुजर यांची 38 वर्ष सेवेनंतर ऑनर फ्लाइट लेफ्टनंट म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा शुभेच्छुक सुनील करोडपती आणि परिवार व बडगुजर समाज मंडळ उल्हासनगर.

    • आपली फ्लाईट लेफ्टनंट म्हणून निवड झाली त्या निमित्ताने सर तुमचे मनापासून हार्दिक शुभेच्छा आलोणे परिवारातर्फे शिरपूर (एन.एस. बडगुजर.)****

  4. फ्लाईट लेफ्टनंट म्हणून आपली
    निवड झाली त्या निमित्ताने मनापासून आपले अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आलोणे परिवारातर्फे शिरपूर (एन.एस.बडगुजर सर)

Leave a Reply

Your email address will not be published.


*