गुणवत्तेचे अस्तित्व कधीच लपून राहत नाही -प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, जळगांव

🤛🤛🤛🤛गुणवत्तेचे अस्तित्व कधीच लपून राहत नाही✍️✍️✍️✍️✍️

💐💐💐💐सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन🍫🍫🍫 💐💐💐💐

विद्यार्थी मित्रांनो आज बारावीचा निकाल जाहीर झाला सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गुण भलेत कमी किंवा जास्त असतील. काही हरकत नाही. कदाचित परीक्षा झाली असती तर अधिक गुण मिळालेही असते. परंतु जे आहे त्यात समाधान मानायला शिका. कारण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो गुणवत्ता कधीच लपून राहत नाही. तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला ज्ञानाची शिदोरी दिली आहे, शैक्षणिक अनुभव दिले आहे ,आणि त्या जोरावर तुम्ही तुमच्या पंखात जे बळ भरले आहे त्या जोरावर भविष्यातील अनेक आव्हाने तुम्हाला स्वीकारायची आहेत. त्यावरच तुमची भावी काळातील उत्तुंग भरारी अवलंबून राहणार आहे. त्यासाठी आजपासून नव्हे आतापासूनच आपणास हार्दिक शुभेच्छा 💐💐💐 घ्या उत्तुंग भरारी

होते है जिनके पास हौसले !
उनिको मिलते है रास्ते !
ये दुनिया नही है दोस्तो !
बुझदिलो के वास्ते!

एक परीक्षा झाली म्हणून सर्व संपत नाही कारण……..

अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन
अभी तो आसमान बाकी है………..

म्हणूनच भावी काळामध्ये केवळ एकच डिग्री न मिळवता. मुक्त विद्यापीठाचा फायदा घेऊन दोन दोन डिग्र्या मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण तीच भावी काळाची गरज आहे.

आपणा सर्वांकडून अपेक्षा एवढीच आहे की यशाने हुरळून जाऊ नका आणि दुःखाने खचून जाऊ नका. तुमच्या यशामध्ये मोलाचा सहभाग असणारे तुमचे जन्मदाते आई-वडील व ज्यांनी तुम्हाला शैक्षणिक कौशल्य प्राप्त करून दिली त्या गुरुजनांना कधीच विसरू नका. यानंतर यदाकदाचित तुमची आणि शिक्षकांची भेट झाली तर “”सर ओळखलत का मला?”” “” सर कसे आहात?”” एवढे विचारायला मुळीच घाबरू नका. आणि हे ही नाही जमले.तर निदान शिक्षक भेटल्यानंतर आपल्या चेहर्‍यावर खुलले थोडे हास्य असू द्या एका शिक्षकाची आपल्या विद्यार्थ्यांकडून एवढीच अपेक्षा असते.

भावी काळामध्ये आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने निश्चितच शाळेकडे बघा. समाजाकडे बघा .जीवनात संयम, सहनशीलता, समाधान,धीर अंगी बाळगा. आपल्या यशाने आपले, पालकांचे, शाळेचे, समाजाचे, नाव मोठे करा. भरपूर वाचन करा कारण तुकाराम महाराजांनी म्हटले आहे….

असाध्य ते साध्य करिता सायास ! कारण अभ्यास तुका म्हणे !…

या देशाचे भावी नागरिक म्हणून जे जे गुण आपल्यात असायला पाहिजे ते ते अंगिकारण्याचा प्रयत्न करा. आपल्या शाळेविषयी शिक्षकांविषयी चांगले असेल,ते ते इतरांना सांगा.

सर्वात शेवटी एवढेच म्हणेल की, गुणवत्ता ही कधीच आपले अस्तित्व लपवून ठेवू शकत नाही. कधी ना कधी ती जगासमोर येतच असते. म्हणून कमी गुण मिळाले असेल तरी नाराज होऊ नका.

दुःखाच्या राईचा रोज येथे पर्वत होतो….
अपयशाच्या स्वप्नामागे एक नव स्मशान येतं….
गुणवत्तेचा इतिहास थोडा तू हि वाच आयुष्य ….
प्रत्येक अपयशानंतर एक यशाचं तुफान येतं…..

कारण या पुढील काळामध्ये तुम्हाला अनेक संधी उपलब्ध होणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात अनेक संधी येत असतात. त्यातील योग्य ती संधी ओळखून. ती प्राप्त करण्यातच जीवनाचे खरे सार्थक असते. खरेतर आपण स्वतः संधी निर्माण केली पाहिजे. तुमचे आवडते छंद सवयी जोपासण्याचा प्रयत्न करा .

अपयशाला व संकटांना पाहून जो सर्द होत नाही….
तोच खरा मर्द……

हे लक्षात ठेवा. तुमच्या शब्दाला धावून येतील असे भरपूर मित्र कमवा. आपल्या वागण्या-बोलण्यातून आपले संस्कार व व्यक्तिमत्त्व झळकत असते. आपण यशस्वी झाल्यास,”” तो आमचा माजी विद्यार्थी आहे””तो माझ्या समाजाचा आहे”” हे सांगायला सर्वांना अभिमान वाटतो. म्हणून जे काही चांगले आहे ते ते करण्याचा प्रयत्न करा. आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा💐💐💐 आपणास उदंड आयुष्य, दीर्घ आरोग्य व भरपूर यश मिळो याच शुभेच्छा💐💐 शुभम भवतू !!यशस्वी भव!!

आपलाच प्राध्यापक मिलिंद बडगुजर( जळगांव ) ९४२११८४४९५

7 Comments

  1. श्री. मिलींद बडगुजर सर ,
    आपण विद्यार्थाना छान मार्गदर्शन केले ,
    प्रोत्साहित केले !
    आपले अभिनंदन !

  2. प्रा मिलिंद बडगु्जर सर-जळगाव खुप चांगले विचार आवश्यक विषयावर मांडले.अभिनंदन.
    शुभेच्छा!
    /डॉ दि धों बडगुजर अमरावती

  3. Mr.Milind Badgujar Sirji Realy Very Important Motivation for Students in future.

Leave a Reply to Ramesh Vamanrao Badgujar Cancel reply

Your email address will not be published.


*